Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २६ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
जामखेड तालुक्यात कोरोनाचे वाढते रुग्ण सीमेलगत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील गावांसाठी धोक्याची घंटा
जामखेड तालुक्यात कोरोनाचे वाढते रुग्ण सीमेलगत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील गावांसाठी धोक्याची घंटा
परंडा प्रतिनिधी राहुल शिंदे दि.25 संपूर्ण भारत देश कोरोना संसर्गजन्य रोगाचा मुकाबला करत आहे.आजचा विचार केला तर कोरोना बाधित संख्या 24525आहे.तर देशाच्या तुलनेत महाराष्ट्र राज्याची स्थिती अत्यंत भयंकर आहे.आज रोजी 6817एवढे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आहे.उस्मानाबाद जिल्हा कोरोनामुक्त जरी झालेला असला तरी,खबरदारी घेणे गरजेचे आहे.परंडा तालुक्याचा विचार केला तर तालुक्याच्या सीमा अहमदनगर,सोलापूर या रेड झोनमधील जिल्ह्यांना लागून आहेत.परंडा तालुक्यातील चिंचपूर(बु) या खेडेगावापासून अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड हे शहर 25किमी अंतरावर आहे.या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह 14 रुग्ण आढळले आहेत.चिंचपूर(बु) ग्रामपंचायतच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून गावात येणारे सर्व मुख्य रस्ते बंद केले आहेत.बाहेरील जिल्ह्यातील व्यक्तीला गावात प्रवेश दिला जात नाही, गावातील लोकांना जिल्ह्याबाहेर जाण्यास परवानगी दिली जात नाही.
गावात जंतूनाशक फवारणी केली आहे, पुणे-मुंबईवरून आलेल्या लोकांच्या नोंदी घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर नुकतेच सांगली-मिरजवरून आलेले ऊसतोड कामगार होम कोरंटाईन ठेवलेले आहेत.ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आलेली आहे. लोकांत जनजागृती केली आहे. शासनाच्या आदेशाचे पालन केले जात आहे.
ग्रामसेवक श्री.लोखंडे , तलाठी श्रीमती मोनिका मसुडगे,पोलीस पाटील व ग्रामसुरक्षा समिती आवश्यकती खबरदारी घेत आहे.
परंडा तालुक्याच्या सीमेलगत जामखेड,बार्शी,कुर्डुवाडी ही रेडझोनमधील शहरे आहेत.अशा परिस्थितीमध्ये एखाद्या कोरोनाच्या पॉझिटिव रुग्णाशी संपर्क झाल्यास त्याच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील सिमेलगत भागातील अनेक लोक बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही हि उस्मानाबादकरांसाठी अतिशय गंभीर व धोक्याची घंटा आहे. कारण परंडा तालुक्याचे तहसीलदार श्री.तुषार बोरकर, जिल्हाधिकारी डॉ दिपा मुधोळ -मुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, जिल्हा चिकित्सक गलांडे यांच्यासह विविध खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उस्मानाबाद जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी 16 ते 18 तास काम करीत आहेत. त्यांनी घेतलेल्या परिश्रमांवर पाणी फेरण्याचा काम काही लोकांमुळे होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे ग्रीन झोन मध्ये आलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कृपया काळजी घ्या, गावकाऱ्यांनो एक लक्षात ठेवा, आपल्यामुळे आपल्या गावाची वाईट अवस्था होऊ नये. येवढेच केल तरी खुप मोठी समाज सेवा व देश सेवा घडेल. प्रशासनाचे आदेश पाळा, नियम हे आपल्यासाठी,आपल्या सुरक्षेसाठी बनवले आहेत या नियमातून पळवाट काढू नका.जर नियमांचे पालन केले नाही तर आपला अस्त होयला वेळ लागणार नाही , हे लक्षात ठेवा.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा