Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २६ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
संचारबंदीत कोणी विनाकारण फिरताना आढळल्यास त्यांचे टाळ्या व शिट्या वाजवून स्वागत करा
संचारबंदीत कोणी विनाकारण फिरताना आढळल्यास त्यांचे टाळ्या व शिट्या वाजवून स्वागत करा
आ.अनिल पाटलांनी अमळनेरकराना दिला गांधीगिरीचा फॉर्म्युला,स्वतःही केली अंमलबजावणी
अमळनेर प्रतिनिधी शहरासह ग्रामीण भागात कोरोना सदृश्य रुग्णांची वाढ झाल्याने निर्माण झालेली आपात्कालीन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासन त्यांच्या परीने लोकांना समजण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु तरी सुद्धा अनेक लोक शहरात संचारबंदी लागु असतानाही विनाकारण छोट्या-मोठ्या कामासाठी शहरात फिरत असल्याने त्यांना शेवटचा पर्याय म्हणून गांधीगिरी मार्गाने डोमिनेट करण्याचा फॉर्म्युला आ अनिल पाटील यांनी सुद्य जनतेला सुचविला असून काल आमदारांनी स्वतः त्यांच्या निवासस्थानाबाहेर या फॉर्म्युल्याची अंमलबजावणी केली.
शहरात कोणत्याही गल्ली बोळात अथवा रस्त्यावर कुणीही विनाकारण दिसल्यास त्यांना स्थानिक लोकांनी सोशल डिस्टनसिंग ठेऊन हात जोडून, टाळ्या वाजवुन स्वागत करावे,आणि लांबुन शिटी वाजवुन त्यांच्या फिरण्याचे कौतुक करावे जेणेकरून त्यांना त्यांचीच लाज वाटेल आणि त्यांची चुक त्यांच्या लक्षात येईल असे आवाहन आमदार अनिल भाईदास पाटील यांनी काल फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून अमळनेर सह परिसरातील नागरिकांना केले होते.यानंतर आमदार अनिल पाटील यांनी याची सुरुवात स्वतःपासून करत त्यांच्या घराच्या अंगणात उभे राहून त्यांनी संचारबंदी लागू असतान विनाकारण जे नागरिक फिरत होते त्यांचे हात जोडुन, टाळ्या वाजवून स्वागत केले,एवढेच नव्हे काहींसाठी त्यांनी शिट्या देखील वाजवून लोकांचे लक्ष वेधुन घेतले,संबंधित फिरणाऱ्या लोकांना त्यांची चुक लक्षात त्यांनी आणून दिली,त्या लोकांनी देखील याबाबत माफी मागत यापुढे आम्ही विनाकारण फिरणार नाही अशी ग्वाही आमदारांना दिली.,दरम्यान यानंतर शहरात अनेक ठिकाणी हाच फॉर्म्युला अनेकांनी वापरल्याचे दिसून आले.
दरम्यान शहरात कोव्हिडं 19 आजाराने थैमान घातले आहे,आज रोजी रुग्ण संख्या 8 झाली असून अमळनेर हॉटस्पॉट होतोय की काय अशी भीती निर्माण झाली आहे, त्याचा प्रचार व प्रसार ग्रामीण भागात होऊ नये यासाठी प्रत्येकाने आतातरी घरातच बसने आवश्यक आहे,असे समजा हा आजार आता परदेशातून थेट आपल्या पायरीपर्यंत आला आहे.आपण बाहेर गेल्यामुळे स्वतःला त्याची लागण होऊन त्यामुळे स्वतःचा कुटुंबाला सुद्धा धोका होण्याचा संभव आहे यामुळे आपण विनाकारण फिरण्याचा हा जो प्रकार ते करताय तो बंद करा व प्रशासनास सहकार्य करा ही विनंती करा अशी विनंती आमदारांनी केली आहे.
गांधीगिरी फॉरमूल्याचे स्वागत
आमदारांनी गांधीगिरी मार्गाने केलेल्या उपाययोजनेचे लोकांनी उस्फुर्त पण स्वागत केले, व आमदारांनी स्वतः रस्त्यावर उतरून लोकांना हात जोडून विनवणी केल्यामुळे सदर लोकांना त्याची चूक लक्षात आल्यामुळे ते स्वतः लज्जित होऊन झाल्या प्रकारामुळे स्वतः माफी मागून या पुढे घरा बाहेर न निघण्याचा निर्धार करून घरा कडे रवाना झाले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एका ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा