Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २६ एप्रिल, २०२०

विवरे बु॥ ला बाहेर गावावरून आलेल्या व्यक्तींसाठी विलगीकरण कक्षाची स्थापना

 

प्रतिनिधी रावेर फैजपूर प्रांताधिकारी तथा इंस्टंट कमांडर डॉ. अजित थोरबोले, व रावेर गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे यांच्या आदेशा वरून विवरे बु॥ ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद मराठी शाळेत बाहेर गावावरून आलेल्या ग्रामस्थांसाठी विलगीकरण कक्ष तयार केला आहे. या कक्षात लाईट, पंखा, गादी, चादर, शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. 
 
बाहेर गावा वरून आलेल्या व्यक्तीने व त्यांच्या नातेवाईकांनी विलगीकरण कक्षात राहण्यासाठी विरोध केल्यास अथवा नकार दिल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.कोणीही बाहेरील  व्यक्ती, नातेवाईक आल्यानंतर त्याला विलगीकरण कक्षात दाखल करावे. सदर येणाऱ्या व्यक्तींची माहिती लपवू नये. माहिती लपवणे. सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. गैरसमज न करता बाहेरून आलेल्या व्यक्तीला विलगीकरण कक्षात दाखल करा. अशा सूचना करण्यात आल्या आहेत. विलगीकरण कक्ष स्थापनेच्या वेळी सरपंच सुनिता सपकाळे, मा.सरपंच  वासुदेव नरवाडे, उपसरपंच रविंद्र वासनकर, ग्रामविकास अधिकारी अरविंद कोलते  बिसन सपकाळे, ग्रामपंचायत सदस्य भागवत महाजन व सर्व सदस्य उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध