Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २९ एप्रिल, २०२०

धुळ्यात रेशन दुकानदारांची "दादा"गिरी* लॉक डाउन मुळे बाहेरगावी अडकलेल्या लोकांना मोफत धान्य देण्यास नकार



धुळे,दि, 27 एप्रिल (प्रतिनिधी) कोरोना आजारामुळे लोकांना काम मिळत नसल्याने मजुरी मिळत नाही । पैसा नसल्याने विकत धान्य घेऊ शकत नाहीत । त्यासाठी राज्य सरकारने मोफत धान्य वाटप सुरू केले । मात्र लॉक डाउन मुळे बाहेरगावी अडकलेल्या लोकांना धान्य मिळत नसल्याने त्यांची उपासमार होत आहे । 

टाळेबंदीच्या काळात लोकांची उपासमार होऊ नये, यासाठी शासनाने मोफत धान्य वाटप सुरू केले । आजाराचा संसर्ग होऊ नये, यासाठी ग्राहकांचा अंगठा घेतला जात नाही । दुकानदार स्वतःचा अंगठा लावून धान्य देत आहे । त्यामुळे घरातील कोणीही सदस्य दुकानात जाऊन धान्य घेऊ शकतो । एप्रिल महिन्याचे धान्य वाटप झाले असून मे महिन्याचे स्वस्त तसेच फुकट धान्य लवकरच वितरीत होईल काही दुकानदारांनी विकत धान्य देऊन शासनाने घोषित केलेले फुकट धान्य वाटण्यासाठी ग्राहकांच्या रेशनकार्ड व आधारकार्डचे झेरॉक्स आधीच जमा करून घेतले होते 

त्यानुसार शासनाकडून प्रत्येक दुकानाला फुकट धान्याचा पुरवठा झाला । परंतु ऐनवेळी दुकानदारांनी  विचित्र अटी घालत धान्यपूरवठा करण्यास मनाई केली दुकानदाराने मनमानी कारभार चालवल्यामुळे  ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे  विकतचे धान्य दिले, झेरॉक्स जमा केले, मात्र प्रत्यक्षात फुकटचे धान्य मिळाल्यावर ते वितरित का करीत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे 

धुळे तालुक्यातील एका तीन अक्षरी आड वळणाच्या शेतीप्रधान गावातील कुटुंब
लॉक डाउनमुळे  बाहेरगावी अडकलं आहे
त्यांना मूळ गावी पोचायला वाहने नाहीत 
त्यामुळे त्यांनी गावातील आपल्या नातेवाईकांना दुकानात जाऊन आमचे  धान्य घेऊन या । गावात पोचल्यावर आम्ही तुमच्याकडून घेऊ, असे सांगितले मात्र प्रत्यक्ष हजर राहिल्यावरच धान्य मिळेल, अशी अट दुकानदाराने घातली 

कुटुंबीयांनी फोनवर दुकानदाराला विचारले की आमच्या वाट्याचे धान्य कोण घेईल यावर आम्ही कोणालाही देऊ, आमची मर्जी, मला शिकवू नको असे उत्तर दुकानदाराने दिले हा रेशन दुकानदार धुळे तालुक्यातील मूळ रहिवाशी असून शिरपूर तालुक्यात सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे त्याचा भाऊ धान्य दुकान चालवतो शासकीय यादीमध्ये मात्र पोलिसांच्या नावे दुकान असून त्याचा मोबाईल क्रमांक दिला होता त्याच नंबरवर कुटुंबियांनी फोन केला होता  त्यांच्या धमकीला घाबरून कुटुंबीय गप्प बसले  याबाबत न्याय मिळण्याची अपेक्षा त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली या विषयी बातमी केल्यास तो कोणत्याही पद्धतीने तो त्रास देईल, अशी भीती कुटुंबीयांनी व्यक्त केली  

दरम्यान केशरी रेशनकार्ड धारकांना धान्य वितरित करण्यात येत असून लोकांकडून 200 रुपये घेतले जात असल्याची चर्चा आहे वास्तविक केशरी रेशनकार्ड धारक मोलमजुरी करून पोट भारतात तर गावात श्रीमंताना पिवळे रेशनकार्ड मिळाले आहे  दुकानदाराच्या विरोधात गेल्यास आम्हाला आयुष्यात तो पिवळे कार्ड करून देणार नाही दुकानदाराने धुळे तालुका पोलीस ठाण्यात अनेक वर्षे नोकरी केल्यामुळे धुळे तालुका नायब तहसीलदार कडे मोठा वशिला आहे परंतु बायकोच्या नोकरी शिरपूर तालुक्यात असल्याने त्या ठिकाणी त्याने बदली करून घेतली तो पैसे घेत असला तरी आम्हाला तोच न्याय मिळवून देईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध