Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २९ एप्रिल, २०२०
'त्या' तबलिगीच्या संपर्कात आलेल्या ४० पोलिसांना शेगावात क्वारंटाईन
‘त्या’ ११ तबलिकींच्या संपर्कात आल्याचा संशय..
बुलडाणा_जिल्हा_पोलिस_अधिक्षक_कार्यालयातील
३९_कर्मचाऱ्यांना_केले_क्वारंटाईन..
१५ जण शेगांव येथील सईबाई मोटे
सामान्य रुग्णालयात भरती..
तर २४ जणांना शेगांव संस्थानच्या विसावा विलगीकरण कक्षात केले दाखल..
तबलिगी जमातच्या धर्मिक कार्यक्रमासाठी कामठी जिल्हा नागपूर येथून आलेल्या व बुलढाणा येथे मागील महिनाभरापासून लॉकडाऊनमुळे अडकलेल्या ११ जणांची तपासणी करण्यात आली असता यामधील तिघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या 39 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना शेगाव येथे विसावा परिसरात क्वारंटाईन करण्यात आले आहे.
२२ मार्च रोजी लॉकडाऊन झाल्याने परत कामठी जिल्हा नागपूर येथे जाण्यासाठी या ११ ताब्लिगी लोकांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे कामठी जाण्याची परवानगी मागितली यावर पोलीस अधीक्षकांनी आधी तपासणी करण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांना कळविले त्यानंतर आरोग्य विभागाने त्यांचे स्वाब घेऊन तपासणी केली असता त्यामधील तिघे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली... तर कामठी जाण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व परवानगी प्रोसिजर पार पाडत असताना त्यांच्या संपर्कात आलेल्या पोलीस खात्यातील बुलढाणा येथील ३९ अधिकारी व कर्मचारी यांना शेगाव येथील विसावा परिसरात क्वारंटाईन करण्यात आले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा