Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २९ एप्रिल, २०२०
परंडा येथे जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद
परंडा प्रतिनिधी दि.29 विवेक जॉन्सन इन्सिडेंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी परांडा यांनी केलेल्या आवाहनाला परांडा तालुक्यातील नागरिकांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे, कोविंड 19 या कोरोना आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परांडा तालुक्यामध्ये आज सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत “जनता कर्फ्यू” पाळण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण तालुका बंद होता.सदर “जनता कर्फ्यू” दरम्यान दूध विक्री, मेडिकल्स, दवाखाने व शासकीय कार्यालय एवढ्याच अस्थापना सुरू होत्या
चिंचपूर(बु)हे अगदी मराठवाड्याच्या सरहद्दीवरील गांव निजामशाहीची नाकेबंदीवरील शेवटचे गांव त्याचं धर्तीवर आज नाके बंदी केली जात आहे.जिल्ह्याबाहेरील व्यक्ती , अनोळखी व्यक्ती यांना गावात प्रवेश दिला जात नाही. गावातून देखील विनाकारण कोणी बाहेर जात नाही व गावात देखील कोणी अनावश्यक फिरताना दिसत नाही. आत्याआवश्यक सेवा फक्त चालू आहेत. ग्रामसुरक्षा समिती मार्फत दक्षता घेण्यात येत आहे.मुख्य रस्त्यावर चेकपोस्ट उघडले आहेत प्रवेश करतांना किंवा बाहेर जातांना नोंद करावी लागत आहे.गावातील जवळ जवळ 350 लोक होम कोरंटाइन केले आहेत.प्रशासकीय सूचनांचे पालन होत आहे. अशी माहिती ग्रामसेवक श्री.लोखंडे यांनी दिली.
तालुक्यातील वाटेफळ येथे लॉकडाऊनचे अगदी काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे, प्रशासनाच्या सूचनांची अमलबजावणी करण्यात येत आहे.आज सकाळी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न केल्यामुळे येथील नागरिक श्री.भांडवलकर दयानंद भगवान यांच्याकडून ग्रामपंचायतने 100रु दंडात्मक कारवाई करून समज दिली आहे.सुरक्षेसाठी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आहे .नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कडक कारवाई करण्यात येत आहे.
तालुक्यातील शेळगांव हे अगदी जिल्ह्याच्या सरहद्दीवरील खेडेगावा रेडझोन मधील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड या कोरोना बाधित गावापासून 30 किमी अंतरावर आहे.कोरोना पासून बचाव करण्यासाठी गावात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.जागोजागी मुख्य रस्त्यावर नाके बंदी करून नवीन लोकांची,गावाबाहेरून आलेल्या लोकांची नोंद घेण्यात येत आहे.सरपंच,ग्रामसेवक व ग्रामस्थांच्या मदतीने,फ्रेंड्स ग्रूपच्या मदतीने लॉकडाऊन पार पडत आहे.
तालुक्यातील हिंगणगांव(खुर्द) येथे ग्रामपंचायतमार्फत आवश्यक त्या खबरदारीच्या सूचना नागरिकांना स्पीकर द्वारे देण्यात येत आहेत.घराबाहेर पडू नका म्हणून आवाहन करण्यात येत आहे.तसेच बाहेरगावातून आलेल्या नागरिकांच्या नोंदी ठेवल्या आहेत.गावात वेळोवेळी जंतूंनाशक फवारणी करण्यात आली आहे.सरपंच - सौ.वैशाली बिडवे, ग्रामसेवक - श्री.सोमनाथ भिलारे, शिक्षक - भाऊराव भिलारे कोरोना सहाय्यक कक्ष यांच्या मदतीने काम सुरळीत चालू आहे.
एकंदरीत आवश्यक तेवढी काळजी परंडा तालुक्यात घेतली जात आहे.प्रशासनाला लोक सहकार्य करत आहेत.आजचा जनता करफ्यू यशस्वीरित्या पार पडला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
धुळे प्रतिनिधी:- महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागातील अपंग युनिट समायोजन प्रकरणामुळे शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिक्षण आयुक्तालय...
-
पारोळा प्रतिनिधी:- जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील वसंतनगर (भोळाणेगोंडा) येथील वसंतराव नाईक ग्रामविकास मंडळ या संस्थेमध्ये मोठ्या प्रमा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा