Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २ एप्रिल, २०२०

त्या राजकीय पक्षांच्या बूथ लेवल समिती व कार्यकर्ते कोठे आहेत ?



खामगाव प्रतिनिधी:निवडणुकी च्या कालावधीत बूथ समिती,कार्यकर्त्यांच्या मीटिंग व प्रशिक्षण घेतल्या जाते, ते निवडणूक जिंकण्यासाठी सर्व पक्ष युद्ध स्तरावर काम करतात.  

मात्र आता कोरोना संक्रमण विरुद्धचे युद्ध सुरू आहे. देश, राज्य, गाव, वार्ड, प्रभाग संकटात आहे. निवडणुकी पेक्षा मोठे काम आहे.  

आणि ही व्यवस्था जर पूर्ण आटोक्यात आणायची असेल तर युद्ध पातळीवर बूथ लेवलवर काम केल्यास या संक्रमनावर विजय मिळवू शकतो. मात्र बूथमध्ये सर्व लोकांचे वोटिंग झाले का ? 144 प्रमाणे बूथ वर फक्त 2 लोक ठेवणे 100 मिटर नंतर राहणे हे सर्व कार्य ही होतात. यासाठी सर्व पक्ष 2 हजार ते 10,000 रु बूथ प्रमाणे वाटपही करतात. एवढेच नव्हे तर पुरी भाजी, चहा, पाणी, मटनपार्टी, इंग्रजी दारु व् खिश्याचीही व्यवस्था पक्ष करतात. भव्य पोस्टर, कार्यकर्त्यासाठी गाडया, ऑटो इत्यादि सारखी वेवस्था हे पक्ष करतात. मात्र आज जे कोरोना युद्ध सुरू आहे. 

मात्र हे बूथ निहाय कार्य होताना दिसत नाही. 
मात्र जे लोक निवडणुकीत उतरत नाही अश्या संघटना,समाजसेवक,जेवणापासून तर अनाज,पाणी,मास्क,औषधी सारख्या वस्तू  देत आहे आणि ह्या सर्व संघटना ज्याचा राजकारण वा सत्तेशी काहीही संबंध नाही, असे लोक आज रस्त्यावर कार्य करीत आहे .
 
मात्र निवडणूक लढणारे पक्ष आणि त्यांची बूथ निहाय टीम मात्र या देशाच्या महामारी युद्धात सक्रिय दिसत नाही.

हे बूथ निहाय टीमने जर बूथ निहाय काम केले तर हे सहज शक्य आहे. तसे पक्षाचे फंड रिलीज करावे व याला निवडणुकी प्रमाणे कोरोनाला हारविण्याची होड असावी असे मला वाटते.
आपले मत काय?
                                      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध