Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २ एप्रिल, २०२०

रामजी मर्यादा पुरुषोत्तम... श्री अर्जुनभोई-सुर्यवंशी



मुंबई प्रतिनिधी:रामजी आपल्यापुढे एक कौटुंबिक आदर्श आहेत. रामाजींना तीन भाऊ होते; परंतु त्यांच्यात कधीही भांडण झाले नाही. ज्या कुटूंबात दुसर्‍याचा विचार केला जातो आणि त्याग करण्याची वृत्ती असते तेथे कधीही भांडणे होत नाहीत.

 रामाजींची मातृ-पितृ भक्ती खरोखरच अनुकरणीय आहे. वनवासात जाण्याची वडीलांची आज्ञा त्यांनी आनंदाने पाळली आणि अशा प्रकारची आज्ञा ऐकून रामजी जराही डगमगले नाहीत किंवा व्यथित झाले नाहीत. रामजी वडिलांची एकही आज्ञा टाळत नसत ते नेहमी प्रसन्न असायचे. 

ज्या कैकयी मातेमुळे आपल्याला वनवासाला जावे लागले तिच्याबद्दलही मनात कोणताही द्वेष न ठेवता रामजी तिला नमस्कार करण्यासाठी गेले होते हा प्रसंग रामाजींचे व्यक्तिमत्व दर्शवतो.

रामजी आणि सुग्रीव यांची मैत्रीही आदर्श होती. वालीला मारण्यासाठी रामजींना सुग्रीवाला, तर रावणाला मारून सीतेला परत आणण्यासाठी सुग्रीव रामाजींना मदत करतो. सुग्रीवावर रामाजींचे खूप प्रेम होते. त्याला थोडेही दु:ख झाले तरी रामाजींच्या डोळ्यात अश्रू येत असत. मित्र असावा तर रामाजीसारखा आणि शत्रूही असावा तर रामाजी सारखा असे लोक म्हणतात रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषणाने अग्नी संस्कार करण्यास नकार दिला होता. 

मृत्यूबरोबर वैर संपत असते म्हणून आपल्या भावाला अग्नीसंस्कार दे'. 'तू जर हे काम करत नसेल तर मी करतो रावण जसा तुझा भाऊ होता तसा माझाही होता.' असे तेव्हा रामाजींनी ब‍िभीषणाला सांगितले होते.

रामाजी सारखा पती मिळावा अशी प्रत्येक स्त्रीची कामना असते. रामाजींचे सीतेवर अमर्याद असे प्रेम होते. सीताही जन्मोजन्मी रामासारखा पती मिळावा म्हणून कामना करत होती त्या दृष्‍टीकोनातून रामाजींचा सीता त्याग आत्मबलिदानाच्या उच्चतम भावनेचे प्रतीक आहे. रामाजींना आपली जन्मभूमी अतिशय प्रिय होती. वालीला मारल्यानंतर किष्किंधाचे राज्य सुग्रीवाला आणि रावणाला मारल्यानंतर लंकेचे राज्य रामाजीने बिभीषणाला दिले होते; परंतु रामाजीला या राज्याचा मोह कधीही आणि कदापि झाला नाही हेच रामायणातील सार आहे. 

'दूर्लभं भारते जन्म'

ज्या भूमीत जन्म दुर्लभ आहे त्या भूमीत जन्म मिळाल्यावरच तेथील महानता समजेल? म्हणून रामनवमीच्या निमित्ताने रामचरित्र समजावून ते अंगीकारण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे... जय श्रीराम, जय सुर्यवंशी



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध