Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ एप्रिल, २०२०

जळगाव जिल्ह्यातील होमगार्ड वर उपासमारीची वेळ... परीक्षा, कोरोना,रामनवमी बंदोबस्तापासून जिल्ह्यातील होमगार्ड वंचित....



जळगांव:प्रतिनिधी: जलगाव जिल्ह्यात जवळपास २००० होमगार्ड जवान आहेत. परंतु जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात होमगार्ड दिसेनासे झाले आहे. देशाचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी देशाच्या सुरक्षेसाठी प्रथम महाराष्ट्र होमगार्ड दलाची स्थापना ६ डिसेंबर १९४६ रोजी केली. 

पुढे चालून या संघटनेने व्यापक रूप धरत संपूर्ण भारत देशात देश सेवा करण्यासाठी होमगार्ड संघटनेची स्थापना करण्यात येऊन मुख्यतः होमगार्ड जवानांना वेगवेगळ्या आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊन त्या त्या परिस्थितीचे नियंत्रण  करण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्यावर पाठवले जात होते. आज मात्र संपूर्ण जगभरासह भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात कोरोना विषाणू ने थैमान घातले असतांना संपूर्ण देशात संचारबंदी करण्यात आली आहे. त्या करीत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे परंतु पोलिसांच्या मदतीला होमगार्ड जवान जवळजवळ कुठेच दिसेनासे झाले आहे. 

काही जिल्ह्यांचा पर्याय वगळता मोजक्याच जवानांना कर्तव्यावर बोलावले जाते याला कारणही तसेच आहे. मागील फडणवीस सरकारने महाराष्ट्रात होमगार्ड जवानांना ६७० रुपये मानधन आणि वर्षातून किमान १८० दिवस काम दिले असता मधेच निवडणूका पार पडल्या असता तत्कालीन सरकारच्या बऱ्याच योजना बदलत असतांना यात काही धोरणांनाचा महाराष्ट्र होमगार्ड दलास मोठा फटका बसला आहे. 

सरकारने होमगार्ड जवानांचे मानधन थकवत पुढील बंदोबस्त व कर्तव्य देण्याकरिता आर्थउक स्थिती व होमगार्डकरीता त्यांना निधीच उपलब्ध होत नाही म्हणून सरळ कामावरून घरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र होमगार्ड सैनिक शासनाने केव्हाही बोलवले तर आपले इतर मोलमजुरी आणि उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे काम व आपल्या कुटुंबाची सुरक्षा "भगवान भरोसे" सोडून बंदोबस्तासाठी उपस्थितच असतात कारण एकीकडे कामावर नाही आले तर संघटनेतून कमी करण्याचा धाक याच कार्यालयाचा.! 

अतिशय कमी मानधन आनि रोजनदारीवर व तोकड्या सेवा सुविधांवर प्रशिक्षित होमगार्डचे मनुष्यबळ हे शासनास महत्त्वाच्या बंदोबस्तावर पोलिसांना मदत म्हणून अस्तित्वात आहे. परंतु शासन याचा या कोरोनाच्या संकटात वापर करताना दिसत नाही आहे. 

नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्तीमध्ये,महत्त्वाचे सण- उत्सव, महत्वपुर्ण निवडणुकांचा बंदोबस्त असो. महाराष्ट्रातील होमगार्ड बंदोबस्तासाठी आले नाही तर नवलच ! 

तसाच होमगार्ड संघटनेचा इतिहासच आहे १९६२ च्या भारत चीन युद्धात होमगार्ड सैनिकांनी पोलीस प्रशासन, भारतीय सैन्याला मोठी मदत केली होती. तसेच १९९३ मधील किल्लारी येथील भूकम्पातील मदत कार्ये, एवढेच नाही तर भारतात झालेल्या २६-११ च्या आतांकी हंल्यात मुंबई होमगार्ड चा जवान छातीवर गोळ्या झेलत शहिद झाला आहे.

एवढे प्रशिक्षित होमगार्ड सैनिक असतांनाही शासन यांना काम न देता या महामारील उपासमारी ची वेळ आणत आहे असेच म्हणावे लागेल. असे असतांना देखील काही होमगार्ड बांधव या महामारीच्या संकटात समाजकार्य करत असताना दिसत आहे. परंतु शासनाने होमगार्ड सोबत न्याय करून होमगार्ड सैनिकांना तात्काळ कामावर बोलवले अशी  होमगार्ड सैनिक बांधवांकडून अपेक्षा आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध