Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

मालेगावमध्ये करोनाचा कहर सुरूच; दिवसभरात ४८ अहवाल ‘पॉझिटिव्ह’



मालेगाव:प्रतिनिधी मालेगावमध्ये करोनाचा कहर सुरूच आहे. आज सकाळी ३६ अहवाल बाधित आढळून आल्यानंतर सायंकाळी पुन्हा १२ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे मालेगाव शहरात आज दिवसभरात ४८ अहवाल बाधित आढळून आले आहेत. यामध्ये चार रुग्णांची दुसरी चाचणी बाधित सिद्ध झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आज दुपारी जिल्हा रुग्णालयाकडे मालेगावमधील नमुन्यांचे ११४ अहवाल प्राप्त झाले. यात १०२ अहवाल निगेटिव्ह आले असून १२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यामुळे एकट्या मालेगावातील करोनाबाधितांची संख्या १७१ झाली असून, जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा १९३ वर पोहोचला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दोन पोलिसांचादेखील समावेश असल्याचे समजते. दोघेही पोलीस रेड झोनमध्ये बंदोबस्तावर होते अशी प्राथमिक माहिती मिळते आहे.

आज मालेगाव मधील जवळपास १५० हून अधिक अहवाल आपल्याला प्राप्त झालेले आहेत. हे सर्व स्वब वेगवेगळ्या दिवशी घेतले होते परंतु किट्स अभावी त्याबद्दलचे अहवाल प्राप्त होत नव्हते. आता आपण किटस पाठवल्यानंतर हे अहवाल तातडीने प्राप्त होत आहेत. जरी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या खूप जास्त दिसत असली तरी ती एका दिवशी एकदम पॉझिटिव्ह आलेले रुग्ण नसून आतापर्यंत साठलेल्या वेगवेगळ्या दिनांकाचे ते रुग्ण आहेत. त्यामुळे एकंदरीत पहिला रुग्ण आढळून आल्या पासून आतापर्यंत ठराविक गतीने दररोज रुग्ण वाढत आहेत. अद्यापही बहुतांश रुग्ण हे मूळ रुग्णाच्या सहवासात आलेलेच व्यक्ती आहेत व ते यापूर्वी आपण क्वारांटाईन केलेले आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध