Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २८ एप्रिल, २०२०
सिद्धेश्वर नगरवासीयांकडून जीवनावश्यक वस्तूचे वाटप
शेगाव प्रतिनिधी लॉकडाऊन असल्यामुळे हातावर पोट असणारे गरीब,निराधार,विधवा,परितक्त्या यांच्या कुटुंबाचा दोन वेळच्या जेवणाचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. अशा या संकटसमयी अनेक माणुसकीचे हात पुढे येत समाजाचे काही देने लागतो हा दृष्टिकोन समोर ठेवून प्रेम नांदोकार या तरुणाच्या पुढाकाराने स्थानिक सिद्धेश्वर नगरातील नागरिकांनी अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर खारीचा वाटा उचलून 30 गरजू कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वाटप करून आपल्या पितरांना खरी श्रद्धांजली अर्पण करून नवीन आदर्श निर्माण केला आहे.
या अनुषंगाने वर्गणी करून वाटप केलेल्या किट मध्ये 5 किलो गहू,2 किलो तांदूळ,2 किलो साखर,1 किलो तूरडाळ,1 किलो तेल,मीठ1 किलो,मिरची पावडर 1 पाव इत्यादी साहित्य होते.वाटपावेळेस सोशल डिस्टनसिंगचे पालन केले गेले. यावेळी गोरे, सोनुने, चोपडे, भटकर, भारंबे, लांडे, घोराळे, सोळंके, आंधळे, गणोरकर, ठाकरे, शेळके, डाबेराव, शेजोळे, मिरटकर, नेमाडे, इंगळे, लखाडे, बोबडे, ठाकूर, शेळके, मिरगे, बायड, मांडवगणे, राठोड,व्यवहारे, जुमळे, गोसावी यांचे सहकार्य लाभले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा