Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २९ एप्रिल, २०२०

कोरोनासाठी केलेले काम उल्लेखनीय- अमोल बागुल


शिरपूर(प्रतिनिधी) कोरोना आरोग्य सर्वेक्षण साठी प्रभाग८व ९ मधील स्वयंसेवकांनी स्वतः जबाबदारी घेऊन सर्वेक्षण जरून सुस्पष्ट अहवाल सादर करून केलेले कार्य उल्लेखनीय आहे त्याचा आदर्श शहरातील सर्व युवकांनी घेऊन कोरोनासाठी काम करून कोरोना लढाई जिंकण्याचे आवाहन न प मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी केले

प्रभाग क्र ८ व ९  मध्ये प्रगणक क्र ६६ व ६७ चे कोरोना आरोग्य सर्वेक्षण शिक्षकांना देण्यात आले होते परंतु ते न आल्याने *न प मुख्याधिकारी अमोल बागुल साहेबांनी सर्वेक्षणाची नगरसेविका सौ छायाताई शामकांत ईशी व शामकांत ईशी यांना विनंती केल्याने या प्रभागाचे कार्यकर्ते व कोरोनात स्वयंसेवक म्हणून वॉर्डात कार्यरत असलेले युवक दिनेश अशोक चौधरी, महेंद्र शरद चौधरी, सोहन हिरालाल चौधरी, आकाश राजेंद्र चौधरी यांनी प्रगणक गटात प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची आरोग्य विषयक माहिती घेऊन ती सुस्पष्टपणे विहीत नमुन्यातील फॉर्म मध्ये भरून ती संकलित केली.

त्याचा अहवाल तयार करून तो तहसीलदार आबा महाजन, न प मुख्याधिकारी अमोल बागुल तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रसन्न कुळकर्णी, डॉ भद्रा मॅडम यांचेकडे सुपूर्द केला यावेळी न प प्रशासकीय अधिकारी संजय हासवानी, न प अभियंता माधवराव पाटील, दीपक मराठे,आरोग्य निरीक्षक अहिरे व न प अधिकारी उपस्थित होते.
 याप्रसंगी तहसीलदार आबा महाजन व मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी  सौ छाया ईशी,शामकांत ईशी व या चारही स्वयंसेवकांच्या कामाचे कौतुक केले व असेच सहकार्य करण्याचे आवाहन केले व कोरोना लढाईत प्रभागात लोकाना मास्क वापरणे, घरातच राहणे, सोशल डिस्टनसिंग पाळणे यासाठी काम करण्याचे सांगितले.

याकामी संदीप पाटील, रमेश चौधरी सर,नंदलाल चौधरी, युवराज चौधरी राहुल फुलारी, गोपाल फुलारी,  लखन मराठे संदीप फुलारी ,भरत लोहार, दीपक मराठे यांचेही सहकार्य लाभले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध