Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २९ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिरपूर नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत निर्जंतुकीकरणासह धुरळणीचे नवीन मशीन उपलब्ध, औषध फवारणी क्षमता वाढली
शिरपूर नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत निर्जंतुकीकरणासह धुरळणीचे नवीन मशीन उपलब्ध, औषध फवारणी क्षमता वाढली
शिरपूर प्रतिनिधी:कोरोना संसर्गा पासून शिरपूर शहराचे संरक्षण करण्यासाठी शिरपूर नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने निर्जंतुकीकरणासाठी पुन्हा नव्याने हाय प्रेशर ब्लोअर मशीन व चार धुरळणी मशीन कालच नगर परिषदेच्या ताफ्यात दाखल केले असून शहरात सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत निर्जंतुकीकरण, औषध फवारणी चे काम सतत सुरु आहे.
माजी मंत्री अमरिशभाई पटेल, शिरपूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल, मुख्याधिकारी अमोल बागुल, सर्व नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने शहरात निर्जंतुकीकरण, फवारणीचे काम वेगाने सुरू आहे.
या फवारणी पथकामध्ये आतापर्यंत चार अत्याधुनिक ब्लोअर मशीन घेण्यात आले आहेत. याद्वारे 40 फूट पर्यंत औषध फवारणी करण्यात येते. तसेच एका मिनिटात 70 लीटर औषध फवारणी होते. तसेच 4 ट्रॅक्टर माऊंटेड स्प्रे मशीन, जुने 4 व नवीन 4 असे एकूण 8 फॉगिंग मशीन यांचा समावेश आहे. शहराची व्याप्ती आणि कोरोना संसर्गाची भीती यामुळे शिरपूर नगरपरिषदेने नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांचे आदेशाने जास्त क्षमतेचे ब्लोअर मशीन खरेदी करण्यात आले असून त्यामुळे पथकाची शहरातील फवारणी करण्याची क्षमता वाढली आहे.
शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी शिरपूर नगर परिषद कटिबद्ध आहे. या सर्व कामांवर नगरपरिषदेचे नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी अमोल बागुल, प्रशासकीय अधिकारी संजय हासवानी, नगर अभियंता माधवराव पाटील, आरोग्य निरीक्षक अहिरे, सुनील जैन, सर्व अधिकारी, कर्मचारी हे लक्ष ठेवून आहेत. सर्वांचे चांगले सहकार्य व मार्गदर्शन प्रशासनास लाभत आहे.
नगरपरिषद स्वच्छता विभागाचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या आरोग्य सुरक्षित ठेवण्या साठी प्रयत्न करत आहेत. सफाई कामगारांचे फार मोठ्या प्रमाणात योगदान आहे हे सर्व जनतेने लक्षात घ्यावे.
नागरिकांनीही स्वतःचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. लाॅकडाऊनच्या काळात आपल्या घरातच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा