Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ११ एप्रिल, २०२०

शासनकर्ते व्हा,शासनकर्ते यांच्यावर अन्याय होत नाही.. श्री अर्जुनभोई, मुंबई।।



आजही आमचा बहुतांश समाज हा मच्छीमार समाज म्हणून उपाशी, अर्धपोटी राज्यात असल्याचे दिसत आहे. 

ज्या समाजस्तरावर जेव्हा जेव्हा अन्याय, अत्याचार होतो तेव्हा तेव्हा तो समाजस्तर शासनकर्त्याच्या रुपात समोर आलेला नसतोच... ही सातत्याने अत्याचाराची मालिका आमचा समाजस्तर स्वातंत्र्यपुर्व काळापासून झेलत आल्याचा दिसतो आहे.

आम्ही राज्यात शासनकर्त्याच्या रुपात आतापर्यंत समोर कधीच आलोच नाही त्याला अनेक कारणे असतीलही.. त्यातुन आमची सतत अवहेलना, आलोचनाच होतच समोर आली आहे. मागील काळ पाहीला असता आमच्यावर मुगल, इंग्रज यांनी सुध्दा सत्तेचा उपभोग घेतला. 

कमीतकमी संख्येने इंग्रज आले, कमीतकमी संख्येने इतरही आले तरीही त्यांनी एकीच्या आणि बुध्दीकौशल्याच्या जोरावर शासनकर्ते म्हणून आमच्यावर राज्य केले, ते राज्यकर्ते झाले. स्वातंत्र्याच्या काळा नंतरही आपण पाहतो जे शासनकर्ते आहेत त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतांना दिसलाच नाही, त्यांच्या महिलांना प्रताडीत केले गेले नाही असे का? तर साधेसोपे उत्तर म्हणजे ते शासनकर्ते..!! आणि आम्हाला ही आमच्या वरील अन्याअत्याचारचा अंत करावयाचा असेल तर आम्हालाही संघटीत होणे महत्त्वाचें आहे

आणि त्यातून शासनकर्ते म्हणून समोर येणे तर अतिमहत्त्वाचे... महाराष्ट्र शासनस्तरावर भोई अंकीत जमातींनी एकतेचा एकत्र एल्गार करावा. 

राज्यात शासनस्तरावर भोई अंकीत म्हणून कहारभोई झिंगाभोई परदेशीभोई राजभोई कहारगोडीया किरात मछुआ मांझी जतिआ केवट ढीवर धीवर धीमर पालेवार मच्छिंद्र नावाडीभोई मल्हार मल्हाव मल्लाव बोई नावाडी नावाडीतारु खाडीभोई गाढवभोई खारेभोई ढेवरा भनारा भनारी भनारे निषाद मल्ला मल्हारभोई नाविकभोई ओडेवार ओडेलु बेस्तार-बेस्ता या ज्या जमाती आहेत त्यांनी एकञ येऊन शासनकर्ते व्हावे ही सामाजिक अपेक्षा... 
जय समस्तभोईराज, जयमहाराष्ट्र

1 टिप्पणी:

प्रसिद्ध