Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १२ एप्रिल, २०२०

एरंडोल पोलिसांची धडक कारवाई ; विखरण येथे गावठी दारूचे रसायन जागीच नष्ट




जळगाव प्रतिनिधी :एरंडोल तालुक्यातील विखरण येथे ईसम नामे-रविंद्र गुलचंद भिल (रा.विखरण तालुका एरंडोल) हा ईसम वनविभागाच्या जागेत गावठी हातभट्टी च्या दारु तयार करण्यास लागणारे व उपयुक्त असणारे गुळ,नवसागर,पाणी मिश्रीत पक्के व कच्चे रसायन व तयार दारु आपल्या कब्जात बाळगुन असल्याची खात्रीशीर गुप्त बातमी मिळाल्याने त्याचेवर १० एप्रिल रोजी राञी ठिक ८:३० वाजता एकुण ८,०००/- रू.किंमतीचे २००लिटर कच्चे रसायन मिळुन आल्याने विषयांकीत स्थळी धडक देत त्यास ताब्यात घेवुन त्याच्या ताब्यातील कच्चे-पक्के रसायन जागीच नष्ट करून त्याचेविरुध्द एरंडोल पोलिस स्टेशन ला प्रोव्ही.गुन्हा रजी.नंबर २९/२०२० महाराष्ट्र प्रोव्ही.कायदा कलम-६५ (ई),(फ),(ब),(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एरंडोल पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे,चालक पोलिस हेड काॅन्स्टेबल रविंद्र सपकाळे, पोलिस नाईक अकील मुजावर,पोलिस नाईक महेंद्र पाटील,होमगार्ड नितीन पाटील,होमगार्ड नंदलाल वानखेडे यांनी कार्यवाही केली तसेच गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस नाईक महेंद्र पाटील हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध