Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १ एप्रिल, २०२०

माढेळी येथे मजुरांना दिला मदतीचा हात... सौ रंजनाताई मनोहर पारशिवे





वरोरा-चंद्रपूर प्रतिनिधी: वरोरा तालुक्यातील माढेळी गावामध्ये कोंढाळी नजिकच्या तरोडा येथे नागपुर जिल्हयातील, वाशिम जिल्हयातील तसेच मध्यप्रदेश येथील छीदंवाडा जिल्ह्यातील भटक्याजमातीचे नागरिक दरवर्षी माढेळी या गावामध्ये मजुरी करण्यासाठी ८५ ते ९० मजुर येत असतात पण या वर्षी कोरोणा या महाभंयकर रोगाची सात चालु असल्यामुळे आणि लॉकडाऊन असल्या कारणास्तव ते गावामध्ये अडकले असल्याची माहीती ही मला माहीत झाली असता मी आणि श्री बंडुभाऊ भोगांडे राष्ट्रवादी अध्यक्ष यांना सोबत घेऊन आम्ही त्यांना भेट दिली आणि काही महिलांना मास्क वाटप केले तसेच तिथल्या दोन व्यक्तीची तब्बेत बरी नव्हती त्यांना आरोग्य रुग्णालयात नेले असता डॉ अविनाश देवतळे यांनी वैद्यकीय उपचार सुरू केले आणि तिथल्या काही डॉक्टरांना यांची काळजी घ्या व चोवीस तास इमरजन्सी सेवा उपलब्ध असु दया अशा सुचना दिल्या तसेच वरोरा येथील पोलीसस्टेशनचे थानेदार श्री सोनटक्केसाहेब यांना फोन केला व त्यांना धान्य व किराणाची सोय करून दया अशी मांगणी केली असता त्यांनीही तात्काळ अन्नधान्याची सोय उपलब्धता करून दिली तसेच त्यांच्या  सम्पूर्ण टीमने वेळेवर मदत केली. 

परिसरातील काही सेवाभावी संस्था असतील तर त्यांनीही मदतीसाठी समोर यावे असेही आम्ही आवाहन करत आहोत. या संकटसमयी जात-पात-धर्म सर्व विसरून मदतीचा हात समोर करा तसेच एप्रील महिना चालु होतोय कोणीही कोनाला एप्रील फुल बनवु नका अशी विनंती करत आहोत. कारण ज्यांनी कोणी ही मस्करी केल्यास त्यांच्यावर पोलीस स्टेशनद्वारे गुन्हा नोदविण्यात येत आहे. सर्वानी यांची काळजी घ्यावी अशी विनंती आम्ही समाजसेवेच्या ठिकाणी करत आहोत. 

सौ रंजनाताई मनोहर पारशिवे
८६९८९७७८७६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध