Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १ एप्रिल, २०२०

राज्यातील मच्छीमार सहकारी संस्थाना सरकारने पँकेज जाहीर करावे... प्रकाश लोणारे



नागपूर प्रतिनिधी:मासेमारी सुरु ठेवण्याचे शासनाचे निर्देश म्हणावे तितके नसल्याने - कोरोनामुळे आर्थिक फटका मच्छीमार सोसायट्यांना बसला आहे तरी अद्याप पर्यंत केन्द्र सरकारने मासेमारी करिता कोणतेही पॅकेज घोषीत न केल्याने नाराजीचा सूर मच्छीमार समाजात उत्पन्न होतांना दिसत आहे. 


तरी गोड्या पाण्यातील मच्छीमार सहकारी संस्थाना सरकारने ₹ २००/- कोटी रुपयांचा पैकेज जाहीर करावे असेही मांगणी प्रकाश लोणारे,राष्ट्रीय प्रमुख-मच्छिमार सहकारी संस्था, प्रकोष्ठ सहकार भारती तथा संचालक महाराष्ट्र राज्य मच्छिमार सहकारी संघ, मुंबई यांनी केली आहे. 

तसेच सन २०२०-२१ च्या माहे मे मध्ये भरावी लागणारी तलावठेका रक्कम ही माफ करावी असेही ते म्हणाले.. महाराष्ट्र राज्यात ३०००चे जवळपास मच्छीमार सहकारी संस्था पाटबंधारे विभागाचे तलाव २५७९ व जिल्हा परिषदेचे तलाव २००१८ यावर मासेमारी करून आपली उपजीविका करणारे राज्यातील ४ लक्ष मच्छीमार कुटुंबातील सदस्य आहेत. आता पर्यंत २० लक्ष मच्छीमार रोजगारा पासून वंचीत आहेत तरी सरकारने मच्छीमार सहकारी संस्था यांचा सारासार विचार करावा असे आम्हाला तरी अभिप्रेत आहे अशी मांगणी प्रकाश लोणारे ०९४२२८०८७९९ (नागपूर ) यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध