Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २७ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
हिसाळे येथे जुगार अड्ड्यावर थाळनेर पोलिसांची धाड ९४००० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
हिसाळे येथे जुगार अड्ड्यावर थाळनेर पोलिसांची धाड ९४००० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
थाळनेर( प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील हिसाळे येथील जुगार अड्ड्यावर थाळनेर पोलिसांनी अचानक धाड टाकून ८जणांना जन्ना मन्ना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले. यावेळी आरोपींकडून ९३३७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना गुप्त बातमी द्वारा मार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रसाळ पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मालचे, सिराज खाटीक यांच्या पथकाने दिनांक २६/४/२०२०रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास तरडी_भावेर शिवारात रामलाल जैन रा. हिसाळे यांच्या शेताजवळ सार्वजनिक जागी लिंबाच्या झाडाखाली अचानक धाड टाकली.
यावेळी आरोपी भीमराव शालीग्राम पाटील, अनिल भीमराव पाटील, विलास धर्मा पाटील, पवन गोविंद परदेशी, धनराज लुका परदेशी, जिजाबराव भीमराव पाटील, अरविंद भाईदास पाटील, कैलास लुका पाटील सर्व रा. हिसाळे तालुका शिरपूर यांना रंगेहात जन्ना मन्ना नावाचा ५२ पत्त्यांचा हार-जीत चा जुगार खेळतांना पकडण्यात आले. यावेळेस आरोपींची अंग झडती घेतली असता१७३७० रुपये रोख रक्कम व ७६००० रुपये किमतीच्या ६ मोटरसायकली असा एकूण ९३३७० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या या धडक कारवाईमुळे अवैध व्यवसायांमध्ये घबराट पसरली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा