Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १९ एप्रिल, २०२०
अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील ६०वर्षीय वृद्ध महिलेला कोरोना पॉझिटिव्ह
अमळनेर:प्रतिनिधी तालुक्यातील मुंगसे या गावातील 60 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळुन आले आहे. सदर महिला जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी दाखल झाली होती. मात्र शनिवारी रिपोर्ट आल्यावर ती पॉझिटिव्ह आढळून आली आहे. पुढील कार्यवाही साठी अमळनेर उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात सर्व अधिकाऱ्यांची मिटिंग झाली असून तसेच मुंगसे गावाच्या आजूबाजूचे चार गाव मुंगसे, सावखेडा, रूंधाटी, दापोरी ही गावे खबरदारी चा उपाय म्हणून सील करण्यात आली आहेत. त्या चारही गावांमध्ये रात्रीच टीसीएल फवारणी झाली असून दि १९ रोजी सुमारे ८ वैद्यकीय पथक जावून त्या द्वारे गावांमधील प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात येणार आहे.
या महिलेला सुरवातीला मुंगसे हुन चोपडा खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर जळगांव येथे खाजगी रुग्णालयात उपचार केल्यावर जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी दाखल करण्यात आले होते. शनिवारी या महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.तसेच आरोग्य यंत्रणा आणि पोलिस हे मुंगसे येथे रवाना झाले असून या महिलेच्या संपर्कात कोण आहेत ? याचा शोध घेत आहेत. दरम्यान ह्या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून अमळनेरकर नागरिकांनी आता तरी खबरदारी बाळगावी असे आवाहन सुज्ञ नागरिकांनी केले आहे.
ग्रामीण भागात कोरोनाची एन्ट्री झाल्याने संपूर्ण तालुक्याला अलर्ट राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.पुढील ३ दिवस तालुका पूर्णपणे बंद राहील,असे सांगण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा