Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

उत्तर महाराष्ट्रातील कोरोना विषाणू तपासणीची पहिली प्रयोगशाळा धुळ्यात सुरू




धुळे प्रतिनिधी  येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयातील विषाणू संशोधन व निधान प्रयोग शाळेत (व्हायरल रिसर्च & डायग्रोटीक लाॕबोरटरी) कोरोना विषाणूच्या तपासणीस सुरूवात झाली असुन दहा नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

अशाप्रकारे कोरोना विषाणूची तपासणी करणारी हि उत्तर महाराष्ट्रातील पहिली प्रयोग शाळा ठरली आहे.या प्रयोगशाळेत प्राथमिक सोयीसुविधा  यंत्रसामग्रीची उपलब्धता या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 1.8 कोटीचा निधी मंजूर झाला आहे.या प्रयोगशाळेसाठी वैद्यकीय महाविद्यालच्या आवारातील 200 क्व्रेअर मीटर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मात्र कोरोना विषाणूची साथ पसरल्यानंतर तातडीची उपाययोजना म्हणून वैद्यकिय महाविद्यालतील सुष्मजीवशास्र विभागात कोरोना विषाणू तपासणीला सुरूवात करण्यात आली आहे.या प्रयोगशाळेला COVID-19 चाचणी प्रयोगशाळा असे नामकरण करण्यात आले आहे.

या तपासणीसाठी IRTPCR या अत्यधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे.या प्रयोगशाळेच्या चाचणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेने काही नमुने तपासणीसाठी या प्रयोगशाळेत पाठवले होते.पहिल्या दिवशी चार तर दुसऱ्या दिवशी दहा नमुन्याची तपासणी करण्यात आली.

या पुर्वी कोरोना विषाणू च्या तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठवावे लागत असत.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध