Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०
भाजीपाला फळांच्या ७१४ पिशव्या वितरित; नागरिकांनी घेतला घरपोच सेवेचा लाभ
नाशिक:प्रतिनिधी भाजीपाला खरेदिसाठी बाजारात गर्दी होऊन करोना संसर्ग वाढण्याची भिती आहे. ते बघता सह्याद्री फार्म्स व शेतकरी गटाच्या माध्यमातून ग्राहकांना थेट घरपोच भाजीपाला व फळे पोहचवली जात आहे. गुरुवारी ही सेवा सुरु झाली. पहिल्याच दिवशी भाजीपाला आणि फळांचा ७१४ पिशव्यांचे नागरिकांना घरपोच वितरण करण्यात आले. नागरीक देखील संपर्क करुन घरी भाजीपाला मागवत आहेत.
करोना व्हायरसचा फैलाव टाळण्यासाठी देशभरात लाॅकडाऊन असून फक्त जीवनाश्यक वस्तुंची दुकाने सुरु आहे. विशेषत: भाजीपाला खरेदिसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. सोशल डिस्टन नियमाचे उल्लंघन होत आहे.
भाजीपाला व फळे खरेदीसाठी नाशिक शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने सह्याद्री फार्मसह इतर काही शेतकरी कंपन्यांनी गटांच्या माध्यमातून नागरिकांना थेट घरपोच भाजीपाला व फळे वितरणाची सुविधा उपलब्ध करून दिली.
त्याची सुरुवात गुरुवारपासून झाली पहिल्याच दिवशी ७१४ पिशव्यांचे यशस्वीरीत्या वितरण झाले. यामध्ये भाजीपाल्याच्या दोन प्रकारच्या तर फळांच्या दोन प्रकारच्या विषयांचा समावेश आहे.
भाजीपाल्याची वर्गाची पिशवी पाचशे रुपयाला तर ब वर्ग पिशवी साडेतीनशे रुपयांना आहे. अनुक्रमे १९० आणि १५८ पिशव्यांचे पहिल्या दिवशी वितरण झाले. तसेच फळांची अ वर्गाची पिशवी ८०० रुपयांना असून १४८ पिशव्या वितरित झाल्या. तर ब वर्गाची पिशवी ३७५ रुपयास असून २२८ पिशव्या वितरित झाले आहेत. ग्राहकांना दोन्ही पर्याय खुले ठेवण्यात आले आहे. त्यानुसार त्याचे पहिल्या दिवशी योग्य वितरण झाले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा