Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २९ एप्रिल, २०२०

पुण्यातील भोई फाऊंडेशन दिव्यांग समाज भगिनीच्या पालकत्वाची भुमिका निभावणार... डॉ श्री मिलिंद भोई



मुंबई/पुणे/नांदेड:कोरोनाच्या लाँकडाऊन काळात नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कुरुळा येथील गरीब, दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग समाज भगिनी कुमारी दुर्गा अंकुश गंदेलपवाड यांनी स्वतः ला केलेल्या मदतीसाठीची दखल आपल्या तरुण गर्जना वृत्तपञाने घेऊन भगिनीला राज्यातील समाज घटकाकडून मदतीचे आवाहन केले असता लागलीच राज्यातील मंत्रालयातील महिला आणि बालविकास विभागाचे सचिव मा लालसिंगजी गुजर साहेब यांनी दखल घेतली आणि संबंधित शिधावाटप विभाग, तलाठी, मंडल अधिकारी यांनी स्वत:भगिनीच्या घरी जाऊन चौकशी केली असता खरीच परिस्थिती लक्षात येता धान्याचे वितरण कुटुंबाला करण्यात आले. 

राज्यातुन अनेकांनी आपले योगदान आँनलाईन पिडीतेच्या आईच्या दिलेल्या बँक खात्यात जमा केले आणि अजुनही मदत आँनलाईन केली जात आहे. पिडीत भगिनी दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग १००℅ असुन त्याबाबत आम्ही भोई फाऊंडेशनचे अध्यक्ष मा डॉ श्री मिलिंद भोई यांना आवाहन केले असता त्यांनी भगिनीला भोई फाऊंडेशन दत्तक घेत असल्याचे व भविष्यात तिच्या अंगभूत कलागुणांना विकसित करण्यासाठी ही मदत करणार असेही मा डॉ मिलिंदजी भोई यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले. 

भोई फाऊंडेशने पुणे जिल्ह्यातील माळीण गांव निसर्गाच्या प्रकोपात नष्ट झाले होते ते बसविण्यात  भोई फाऊंडेशनने फार मोठी भुमिका घेतली आहे तसेच नांदेड जिल्ह्यातील अनाथ आणि असाय्य अशा २० मुलांचे पालकत्व ही भोई फाऊंडेशन करत आहे यातच पिडीत भगिनीचा २१वा क्रमांक आम्ही लावत आहोत असेही मा डॉ मिलिंद भोई  त्यांनी सांगितले. पिडीत भगिनी ही गायन कला शिकत असुन तिला त्यात आपले करिअर करायचे आहे तरी त्यात तिला योग्य ती मदत मिळावी म्हणुन आम्ही लाँकडाऊनच्या काळा नंतर नांदेड जिल्ह्यातील कंधार कुरुळा याठिकाणी नियोजन करुन मा डाँ मिलिंदजी भोई यांच्या सोबत भगिनीला भेट देणार आहोत आणि त्यानंतर काही दिशा ठरणार आहे. 

तरुण गर्जना आपलं हक्काच विचार व्यासपिठ आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करत आहे आणि करतही राहणार कारण आपण मदतीसाठी सतत पुढे उभे राहत आहात. खाली दुर्गाचा संपर्क क्रमांक देत आहोत. 

Durga Ankush Gandelapawad
Mobile:- 9145652043,
What'sApp No:-9421764353


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध