Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २९ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
पळासनेरला धोबी समाजात साध्या पध्दतीने पार पडला विवाह समाजाने या विवाहाचा आदर्श घ्यावा: एकनाथराव बोरसे
पळासनेरला धोबी समाजात साध्या पध्दतीने पार पडला विवाह समाजाने या विवाहाचा आदर्श घ्यावा: एकनाथराव बोरसे
पंतप्रधान व मुख्यमंत्री निधीत प्रत्येकी रु.५१०० ची वर देणार मदत*
शिरपूर:प्रतिनिधी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी असुन देशासह राज्यात सर्वत्र सर्वच कार्यक्रमांना बंदी घालण्यात आलेली आहे. यामुळे अनेकांना आपले नियोजित विवाह पुढे ढकलावे लागले आहेत. मात्र शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे नियमांचे पालन करीत कुठला ही वाजागाजा न करता, सोशल डिस्टन्सिंग पाळुन तोंडाला मास्क लावुन धोबी समाजातील विवाह पार पडला.
पळासनेर येथील वर दिपक बन्सिलाल शिरसाठ- धोबी व शहादा येथील वधु धनश्री गोविंद बच्छाव- धोबी यांचा विवाह (दि.२७ एप्रिल) रोजी अवध्या १० जणांचा उपस्थित पळासनेर येथे वराचा घरी पार पडला.
याप्रसंगी परिट (धोबी) सेवा मंडळ धुळे जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच संघटना शिरपूर तालुकाध्यक्ष भास्कर बोरसे, सांगवीच्या माजी उपसरपंच तथा परिट (धोबी) सेवा मंडळ विभागीय अध्यक्षा सौ. अरुणाबाई बोरसे, पळासनेर उपसरपंच सतीष वाणी यांचासह वराचे आई, मामा, बहीण, मेव्हुणे तर वधुचे आई, मामा, मावशे यांचा आणि भटजीच्या मंत्रोपचाराच्या साक्षीने त्यांचा विवाह पार पडला. वर दिपक व वधु धनश्री या नवदापत्यांना अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, शिरपूर तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे यांनी शुभेच्छाच्या दिल्या आहेत.
विवाह सोहळ्याची धामधुम न केल्यामुळे वर दिपक शिरसाठ याने पंतप्रधान व मुख्यमंत्री निधीत प्रत्येकी ५१०० रु देण्याचे जाहिर केले आहे. लाॅकडाउनमुळे वर- वधुने कोणत्या ही नातेवाईक व वर्हाडी मंडळींची गर्दी केली नव्हती अत्यंत साध्या पध्दतीने तोंडाला मास्क लावत हा विवाह सोहळा पार पडला. समाजाने या विवाहाचा आदर्श घ्यावा व जिल्हासह इतर ठिकाणी कोरोना माहामारीच्या लाॅकडाउन दरम्यन पुर्वनियोजित विवाह तिथिनुसार नियमाचे पालन करुन साध्या पध्दतीने गर्दी व वाजागाजा न करता विवाह सोहळा पार पाडण्यासाठी समाजातील त्या त्या भागातील प्रमुख व्यक्तीने पुढाकार घ्यावेत असे आवाहान अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा