Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

प्रा.राकेश अमृतकर यांचा ऑरगॅनिक केमिस्ट्री व मेडिसिनल केमिस्ट्री विषयावर विद्यार्थ्यांशी ऑनलाइन क्लास द्वारे संवाद



मालेगाव:प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, बंद झाले आहेत,याप्रसंगी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांना शिक्षणाची कमतरता भासू नये म्हणून मालेगाव येथील समाजश्री प्रशांतदादा हिरे 

औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक व रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.राकेश अमृतकर यांनी गुगल क्लासरूम, स्लाइड शेयर ,यु-टुयब, जिनोमी-मुडल, वर्ड-प्रेस, झुम, या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या साहाय्याने लेक्चर घेत आहेत. बी फर्मासीच्या द्वितीय व चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांना ऑरगॅनिक केमिस्ट्री व मेडिसिनल केमिस्ट्री हे विषय प्रा.अमृतकर इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या साहाय्याने शिकवत आहेत 

तसेच विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य लिंक व पीडीएफ स्वरूपात विद्यार्थ्यांना गुगल क्लासरुम मार्फत पाठवत आहे. याप्रसंगी विद्यार्थी देखील उत्साहाने सहभाग घेत आहेत.

एकीकडे परीक्षेच्या बाबतीत संभ्रम असताना आणि कोरोना अजून पसरत असताना सगळीकडे अनिश्चितता आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रा.अमृतकर यांचे हे उपक्रम विद्यार्थ्यांना सोयीस्कर ठरत आहेत.त्यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध