Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १३ एप्रिल, २०२०

कोरोना व्हायरसच्या पाश्वभूमीवर सप्तशृंगी महिला संस्थेकडून विविध उपक्रम





प्रतिनिधी कोरेनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी घोषित करण्यात आली आहे, यामुळे त्यामुळे त्यामुळे अनेकांचे हाताचे काम गेले आहे,अशा परिस्थितीत धुळे येथील सप्तशृंगी बहुद्देशीय महिला संस्थेकडून तमासगीर महिला कलावंत, अतिजोखीम गट पुरुष व महिलांना किराणा, मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले तर शिंदखेडा येथे अतिजोखीम गट पुरुष व महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 

लॉकडाऊनमुळे अनेकांची गैरसोय होत आहे हि बाब लक्षात घेऊन शहरातील मीना भोसले यांनी सप्तशृंगी महिला संस्थेच्या माध्यमातून उपेक्षित घटकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. यात्रा रद्द झाल्यामुळे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे,त्यामुळे महिला कलावंतांना संस्थेतर्फे पंधरा दिवस पुरेल इतका किराणा देण्यात आला. शिंदखेडा येथे अतिजोखीम गट पुरुष व महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागात विधवा, परित्यक्ता घटस्फोटित महिलांना किराणा देण्यात आला. वडगाव येथील गावातील गरजू परिवारांना किराणा वाटप करण्यात आला. 

तसेच अनाथ मुले, मुलींचे निरीक्षणगृह, महापालिकेचे स्वछता कर्मचारी आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मास्क आणि सनिट्झरचे वाटप केले. त्याचप्रमाणे एच.आय.व्ही. बाधितांची गैरसोय टाळण्यासाठी त्याना घरपोच औषधांचा पुरवठा करण्यात आला. तसेच संस्था अध्यक्ष यांच्या सांगण्याने सप्तशृंगी नगरात निर्जंतुणूकाची फवारणी करण्यात आली. उपक्रम राबविण्यासाठी संस्थेच्या अध्यक्ष सौ. मीना भोसले , हिरालाल भोसले, संजय सैतवाल, एकनाथ महाजन, लतीफ शेख, अलका थोरात, फजलू रेहमान,संगीता पाटील,सुनंदा राणे, सुनीता सैंदाणे,नरेंद्र भोई,राधेश्याम देशमुख, प्रथमेश पाटील, मोहिनी दाभाडे ,लोटन करनकाळ,सुनील श्रीराव,आदींचे सहकार्य मिळाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध