Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १३ एप्रिल, २०२०

अमळनेर व चोपडा तालुक्यात मास्क वापरणे बंधनकारक : प्रांत सीमा अहिरे


अमळनेर i उपसंपादक –(पंकज पाटील ) कोरोनो व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अमळनेरच्या प्रांत सीमा अहिरे यांनी चोपडा  व अमळनेर तालुक्यातील   नागरिकांना मास्क लावण्याची सक्ती केली आहे. जे नागरिक मास्क लावणार नाहीत त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत  गुन्हा दाखल करून पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तो दंड मुख्यमंत्री सहायत्ता निधी कोविड-१९ मध्ये जमा करण्यात येणार आहे. मास्क नसल्यास स्वच्छ धुतलेला रुमाल व घरी बनवलेल्या मास्कचा वापर करण्यास देखील त्यांनी परवानगी दिली आहे.

कोविड-१९  या महामारीच्या आपत्ती काळात अमळनेर प्रांत सीमा अहिरे , तहसिलदार मिलिंद वाघ , गट  विकास अधिकारी संदीप वायाळ व पीआय अंबादास मोरे  हे अत्यंत चांगल्या प्रकारे कार्य करत असून आतापर्यंत तरी त्यांनी सर्व परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. तालुक्यातील लोक प्रतिनिधींचे  देखील त्यांना मोठे सहकार्य लाभत असून त्यांना कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी संपूर्ण मोकळीक देण्यात आली आहे.

या आपत्ती काळात तालुक्यातील सर्वच शासकीय अधिकारी व ग्रामीण भागातील सर्व कर्मचारी या महामारीत नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन करत आहेत .त्यामुळे नागरिकांकडून सर्वांचे कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध