Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २६ एप्रिल, २०२०

लॉकडाऊन असताना अमळनेरमध्ये शबनमचा 'विकास ' आणि लव्ह, सेक्स और धोका...अखेर गुन्हा दाखल



मिळालेल्या माहितीनुसार अमळनेर चे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना मनोज शिंगाणे ह्यांनी पूर्ण कल्पना दिली होती परंतु अंबादास मोरे अमळनेर पोलीस निरीक्षक म्हणालेत कि ती महिला अमळनेर मध्ये दाखल झाल्यानंतर बघू याचा अर्थ कि अमळनेर मध्ये सिमा तोडून आलेत तरी चालेल असा झाला दिनांक 24 ला सकाळी अमळनेर मध्ये दाखल होवून जो अमळनेर मध्ये जी घटना घडली ती घडलीच नसती त्या दिवशी 24 तारखेला दिवसभर अंबादास मोरे यांना फोन करून सुध्दा त्यांनी ते उचल्ले नाहीत अमळनेर मध्ये येण्यासाठी तिला आशय कोणी दिला ती अमळनेर मधील कोणाच्या संपर्कात आहे याची ही कसून तपासणी करून त्या महिलेचे  सि डी आर काढणे गरजेचे असून तीला लगेच जामिन कसा काय दिला.  हि शबनम मोमीन ऊर्फ समिना मोमीन हि चार जिल्हे ओलांडून आली असून अमळनेर मध्ये मास्क न लावता अमळनेर शहरात बिनधास्त मोटर सायकल स्वत : चालवत फिरत होती हिला अटक केली त्यानंतर तीचे पविलगिकरन का करण्यात आले नाही हा हि खूप महत्त्वाचा प्रश्न असून अंबादास मोरे अमळनेर पोलीस निरीक्षक ह्यांनी अमळनेर चे तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ ह्यांचे अनैतिक संबंध असलेल्या या स्त्रीला शबनम मोमीन ऊर्फ समिना मोमिन हिला अप्रत्यक्ष रित्या मदत केली असे म्हटले जात आहे  .
*****************************
अमळनेर:प्रतिनिधी: देशभरात लॉकडाऊन असताना केळगांव (अहमदनगरहून) अमळनेरात येऊन एका महिलेने दुसऱ्या महिलेला धमकी दिल्याची तक्रार अमळनेर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला FIR NO - 0244 नुसार फिर्याद दाखल .
लॉकडाऊनच्या काळात जिल्हा बंदी असतांना अहमदनगरहून आलेल्या शबनम मोमीन उर्फ समीना मोमिन या महिलेने ज्योती भोई यांच्या घरात प्रवेश करण्याच्या आधी महिला पोलिस कॉन्स्टेबल असल्याचे फिर्यादीच्या आईस सांगितले व घरात प्रवेश केल्यानंतर ता. जि. अहमदनगर येथील व अमळनेरचे तत्कालिन पोलिस निरीक्षक विकास वाघ ह्यांची पत्नी असल्याचे सांगितले .

नाशिकचे आयजी साहेब ह्यांच्या कडे केलेला तक्रारी अर्ज मागे घेतला नाही तर तुला  जीवे ठार करेल अशी जिवे ठार मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद ज्योती भोई यांनी दिलेली आहे .

मिळालेल्या  माहितीनुसार, शुक्रवारी ठिक सकाळी सहा वाजता फिर्यादी यांच्या राहत्या घरी जावून शबनम मोमीन ऊर्फ समीना मोमीन(केडगाव -नगर जिल्हा)अहमदनगर येथील कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विकास वाघ व अमळनेरचे तत्कालिन पोलिस निरीक्षक विकास वाघ यांचे अनैतिक संबंध असलेली शबनम मोमीन ऊर्फ  समिना मोमिन  यांच्यावर अमळनेर पोलीस स्टेशनला पोलिसांनी भारतीय दंड संहिता १८६० अन्वये ४५२,२९४,१८८,३२३,५०४,५०६ व मोटार वाहन अधिनियम १९८८ अन्वये १७९(१)  अन्वये अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला . अमळनेर पोलीसांनी शबनम मोमीन ऊर्फ समिना मोमिन हिला अटक केली आहे.

विकास वाघ अमळनेरचे तत्कालीन  पोलीस निरीक्षक होते. 

ज्योती भोई अमळनेर दक्षता समितीत सदस्या होत्या त्यामुळे महिला दिनाच्या कार्यक्रमात  त्यांची विकास वाघ ह्यांच्याशी ओळख झाली होती व डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या  दिवशी माजी आमदार शिरीष दादा चौधरी, ज्योती भोई नगरसेवक व विकास वाघ यांचे त्या कार्यक्रमातील फोटो फेसबुकवर टाकले होते विकास वाघ यांचे अनैतिक संबंध असलेली शबनम मोमीन ऊर्फ समिना मोमिन यांनी ते  पाहिलेत ,त्यांना ती बाब खटकली ,त्यांचे प्रियकर वाघ यांच्या कडून ज्योती भोई यांचा मोबाईल नंबर घेतला.मोबाईल नंबर मिळाल्यानंतर त्यांनी त्यांना त्यांच्या वैयक्तिक व्हाट्सएपच्या नंबरवर धमकी वजा अश्लील शब्दांचा वापर केला, स्त्री जातीला लज्जा निर्माण करतील अश्या शब्दांचा वापर करत शिवागाळ केली होती .


अहमदनगर येथील कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व अमळनेर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ व यांचे अनैतिक संबंध असलेली शबनम मोमीन ऊर्फ समिना मोमीन यांनी केलेल्या वर्तनाबाबतीत अमळनेर तत्कालिन पोलिस निरीक्षक विकास वाघ यांना ज्योती भोई यांनी  तीनदा सुनावले होते व त्यांची  चांगलीच कान उघाडणी केली होती. घडलेला संपूर्ण प्रकार फिर्यादीने विकास वाघ यांना सांगितला तुम्ही तुमचा वैयक्तीक विषय तिकडेच बघा ह्या नंतर तुमचे अनैतिक संबंध असलेली शबनम मोमीन ऊर्फ समिना मोमीनने असे केले तर मी  कायदेशीर कारवाई करण्यासाठी आपल्या वरिष्ठांकडे तक्रार करेल व न्याय मागेल. 

प्रेमाचा जाळ्यात अडकलेल्या विकास वाघ यांनी ज्योती भोई यांना हे सांगून टाळले की , ती  माझी प्रियसी असून आमचे अनैतिक संबंध आहेत तुम्ही तिचा नंबर ब्लॉक करा . असे सांगून झाल्यावर ही विकास वाघ यांचे अनैतिक संबंध असलेली शबनम मोमीन ऊर्फ समिना मोमीन हिने ते कृत्य परत केले. त्यानंतर ज्योती भोई यांनी नाशिक आयजी ,आपले सरकार आणि नगर येथील पोलीस अधिक्षक यांच्याकडे पीआय विकास वाघ व ह्यांचे अनैतिक संबंध असलेली शबनम मोमीन ऊर्फ समिना मोमिन यांची तक्रार केली आहे.

तक्रार मागे घेण्यासाठी विकास वाघ यांनी  ( फिर्यादी )ज्योती भोई यांच्या वर अनेक प्रकारे दबाव आणला दबावाला न जुमानता आपली तक्रार कायम ठेवत एकाकी लढा त्यांनी सुरूच ठेवला  .ज्योती भोई तक्रार मागे घेत नसल्याचे लक्षात आल्यावर विकास वाघ ह्यांनी त्यांचे अनैतिक संबंध असलेली स्त्री शबनम मोमीन ऊर्फ  समिना मोमिन प्रियसी यांना फिर्यादी यांच्या घरातील व्यक्तींचे नंबर व पत्ता देखील  दिला .प्रियसी शबनम मोमीन ऊर्फ समिना मोमिनला फिर्यादीच्या मागे लावून प्रकरण शांत करण्यास सांगितले.

ज्योती भोई न्यायासाठी सनदशीर मार्गाने लढा देत होत्या .त्यांच्या तक्रारीनुसार जळगांव येथील  अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी सुनावणी ठेवली होती .असे असतांना देखील ज्योती भोई या सामजिक कार्यकर्त्या याच्या घरी जावून त्यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याचा केलेला हा प्रयत्न म्हणजे प्रशासनातील काही असभ्य अधिकारी यांचा मुजोरपणाच म्हणावा लागेल. ज्योती भोई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संपूर्ण प्रकार त्यांनी अमळनेर तहसिलदार व पीआय यांच्याशी संपर्क करून सांगण्याचा प्रयत्न केला असता  त्यांनी प्रतिसाद दिला नाही. घडलेल्या प्रकारात तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ यांचा अप्रत्यक्ष माफ करा प्रत्यक्ष सहभाग असल्याने गुन्हा दाखल करण्यास देखील टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे माजी आमदार शिरीष दादा यांच्या कडून ज्योती भोई यांनी मदत घेतल्यानंतर अमळनेर पीआय यांनी गुन्हा दाखल केला .

कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी असतांना समिना मोमेन अमळनेरमध्ये दाखल झाल्याचं कश्या ? हा  देखील मोठा प्रश्न असून ? नेमके कुणाच्या पाठबळावर त्या अमळनेर तालुक्यापर्यन्त पोहचल्यात हे देखील तपास करणे गरजेचे आहे. दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजाबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित करणारा प्रकार असून त्याची देखील चौकशीची मागणी फिर्यादी यांनी केली आहे.असं असलं तरी ज्योती भोई यांनी विकास वाघ यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली.
शबनम मोमीन ऊर्फ समिना मोमिन नामक महिले ने अनेक महिलांना अश्लील एस एस व काँल केले होते व अशा पध्दतीने त्रास दिलेला आहे पण ज्योती भोई ह्यांनी तिचे अजिबात ऐकून घेतले नाही व प्रत्येक वेळेस अमळनेर चे तत्कालीन व अहमदनगर कोतवाली चे विकास वाघ पोलिस निरीक्षक व त्यांचे अनैतिक संबंध असलेल्या स्त्री वर कायदेशीर कारवाई केली
लॉकडाऊन नंतर सनदशीर पद्धतीने न्याय मागण्यासाठी उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले .

कोरोनामध्ये अमळनेरात प्रेमाचा व्हायरस कसा शिरला, हाणामारी, दणादणी सुरू राहिली तर प्रेमाचा 'विकास' 
कसा होणार.......खरं तर ‘प्रेमात ज्योत से ज्योत मिलाते चलो, प्यार के गीत गाते चलो असंच असलं पाहिजे’.

पण ते पोलीस प्रशासनात राहून नव्हे  तेही विवाहित असतांना पहिल्या पत्नीचा विश्वास घात करत केलेला हा प्रेमाचा व्हायरस निश्चितच समाजासाठी व देशासाठी घातकच ठरेल .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध