Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २६ एप्रिल, २०२०
शिरपूर वरवाडे नगरसेवकांनी केले घरोघरी जाऊन कोरोना सर्वेक्षण
शिरपूर(प्रतिनिधी) शिरपूर वरवाडे नगर परिषदेतर्फे शिरपूर कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांचे सर्वेक्षण प्रभाग क्र ३ मध्ये नगरसेवक तथा आरोग्य सभापती चंद्रकांत सोनावणे यांनी स्वयंसेवकांमार्फत सुरू केले आहे.
शिरपूर वरवाडे नगर परिषद क्षेत्र हे कोरोना प्रतिबंधित क्षेत्र घोषित झाले असून यासाठी नगर परिषदेने माजी मंत्री अमरिषभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली आ कांशीराम पावरा, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल मुख्याधिकारी डॉ अमोल बागुल व सर्व नगरसेवक ,अधिकारी, कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
यासाठी शहरातील लोकांचे प्रगणक निहाय सर्वेक्षण करणे, प्रगणक गटातील प्रत्येक कुटूंबाची माहिती भरून सर्वेक्षण करण्याचे ठरविले आहे त्यानुसार प्रभाग क्र ३ चे नगरसेवक चंद्रकांत सोनवणे यांनी आपल्या प्रभागात स्वयंसेवकामार्फत ,शिक्षक, आंगणवडी सेविकांकडून घरोघरी जाऊन माहिती घेऊन ती संकलित करून भरून घेत आहेत.
यासाठी नगरसेवक तथा आरोग्य सभापती,चंद्रकांत सोनवणे व शिक्षक , राकेश कोळी प्रकाश माळी व स्वयंमसेवक राहुल कोळी तुषार शेटे महेश कोळी किरण कोळी भुपेश कोळी शेखर कोळी दिनेश मंडाले प्रशांत कोळी उपस्थित होते......
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा