Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

सावदा पालिकेकडून मुख्यमंत्री एक कोटी सहाय्यता द्यावा ; राजेश वानखेडे



रावेर ( प्रतिनिधी )देशा सह राज्यात आज मितीस कोव्हिडं १९ या सौसर्गजन्य  महामारी संदर्भात उपचार तसेच गोरगरीब, गरजू यांच्या उपजीविके साठी  याना  पालिकेच्या विविध विकास निधींअंतर्गत  रक्कमेतून राष्ट्रीय आपत्ती साठी  सहभाग या दृष्टीने पालिकेकडून  "एक कोटी " रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत निधी देऊन सहभाग नोंदवावा अशी रास्त मागणी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे यांनी मा. अनिता येवले नगराध्यक्षा, मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना मागणी पत्राद्वारे केली आहे .

करोना व्हायरस ( कोव्हिडं  -१९ ) या महामारी सौसर्गजन्य मुळे देश्यासह राज्यात नागरिक बाधित झाले असून.सदर महामारीचा सामना करणासाठी  देशा सह राज्य होळपळून निघाले आहेत .राज्यात लोकडाऊन असलेले सर्व क्षेत्र व कंपन्या बंद असल्याने शासनाकडे येणारा महसूल पूर्णपणे थांबलेला आहे तसेच कोव्हिडं- १९सामना करण्यासाठी शासनातर्फे उपचारावर व गोरगरीब यांच्या जेवणासाठी, रेशनवर धान्य वाटप करण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहेत .याकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधी मदत करणे आज आवश्यक आहे. 

तरी पालिकेकडे विविध कामास अंतर्गत ठेव अनामत रकमेतून राष्ट्रीय आपत्ती साठी आपला सहभाग नोंदविण्याच्या दृष्टिकोनातून पालिकेने एक कोटी रुपये मुख्यमंत्री सायता निधी देण्यात येऊन पालिकेने सहभाग नोंदवावा अशी  मागणी राष्ट्रवादी  नगरसेवक  राजेशवानखेडे यांनी केली आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध