Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

सावद्यात ग्राम देवता मारीमता मंदीर सह हनुमान मंदिर सुकसुखट....! मरीमाता यात्रा व बजरंग बली मिरवणूक रद्द



रावेर ( प्रतिनिधी ) येथील मारीमता मंदिर सह शहरातील हनुमान मंदिरावर साजरी केली जाणारी हनुमान जयंती यंदा कोठेही साजरी करण्यात आली नसल्याने शहरातील मंदिरावर सर्वत्र शुकशुकाट होता .
   मरीमाता मंदिरावर संध्याकाळी ६वाजता  एक गणेश भगत सह दोन सद्स्य अश्या लोकांनी केले  पूजन .
   येथील स्थानिक व परिसरातील देविभक्त गणाचे श्रध्दास्थांन असलेल्या पौराणिक महत्व असलेल्या  मारीमता यात्रा कोरोना व्हायर्सच्या लक्ष्मण रेषेचे सावट असल्याने . देशभरात  संचार बंदी ,कर्फ्युव सुरु असून नागरिक एकत्र येऊ नये अशी नोटीस  पोलीस प्रशासन यांनी बजवल्याने  यात्रा  व यात्रेनिमित्त ओढल्या जाणाऱ्या बारागाड्या रद्द करण्यात  आल्या  चैत्र पौर्णिमेची हनुमान जयंती  निम्मित दि ८ रोजी भरणारी यात्रा व त्या निमित्य बारा गाड्या ओढल्या जातात त्या सुद्धा ओडण्या रद्द  करण्यात आल्या होत्या . आज  संध्याकाळी मंदिराचे 
विश्वस्त  सदस्य प्रमोद चौधरी , बारागाड्या ओढणारे गणेश भगत ( चौधरी ),प्रभाकर जानकिराम चौधरी यांनी संध्याकाळी ६ वाजता बारागाड्या ओढण्याचे वेळेवर मारीमातेचे विधीवत पूजन व आरती मंदिरा आतच केली.
 शेकडो भाविक यात्रे निमित्त येत असत आज  यात्रा रद्द असल्याने कोणीही भाविक दर्शनाला आले नाही . यात्रेचे जागी सुकसुकटने जागा घेतली. तसेच याच दिवशी हनुमान जयंतीनिमित्त ,गांधीचौक भागातील मोठा मारुती येथे हनुमान जन्मोत्सव पूजन माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांचे हस्ते     तर पाटील पुरा भागातील लहान मारोती येथे  पूजन  संदीप वानखेडे यांचे हस्ते झाले . पोरहित  सतीश जोशी यांनी केले  ,क्रांती चौक येथील उत्तर पुखी हनुमान येथे ईश्वर नेमाडे  व राजू परदेशी यांचे हस्ते  मूर्तीचा अभिषेक करण्यात आला .पोरहित् गुणवंत जोशी यांनी केले
समस्त जय बजरंग प्रतिष्ठान यांनी सहकार्य केले बजरंग प्रतिष्ठान यांनी दरवर्षी हनुमान मूर्तीचे मिरवणूक काढण्यात येते ती  संचार बंदी व कोरोना विषाणू संसर्ग मुळे रद्द करण्यात आली होती.
  ,निमयाय माता नगर मधील दक्षिण  मुखी हनुमान मारुती  पूजन  परिसरातील नागरिक यांनी केली,ओम कॉलनीतील  चिमुकले हनुमान मंदिरात पूजन आरती निवृत्त प्रा.  वसंत होले यांनी केली ,स्वामींनारायन नगरातील हनुमान मंदिर, स्वामींनारायन मंदिरातील कष्टभंजन देव येथे स्वामी नि केले, कोष्टी वाडातील जागृती हनुमान मंदिर  येथे  पूजन किशोर जोशी यांचे उपस्तीतीत गौरव बारघरे  याचे हस्ते पूजन करण्यात आले.
आज शहरात   हनुमान जयंती उत्सव हे संचार बंदी पालन करून कोठेही गर्दी न करता केवळ एक पुज्यारी सह मंदिराच्या आताच विधिवत पुज्या- आर्च करण्यात आली . व शासनाच्या आदेशाचे पुरेपूर आदेश्याचे  पालन करण्यात आले आहे .
   नागरिकांनी जसा संयम आजच्या दिवशी ठेवला तसाच संयम या पुढील काळातही  ठेवावा व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुख्यधिकारी सौरभ जोशी व सपोनि राहुल वाघ यांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध