Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १ मे, २०२०
जळगाव जिल्ह्यात आणखी पाच कोरोना बाधित रूग्ण आढळले
जळगाव जिल्हा प्रतिनिधी:काल रात्री प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील संशयित रुग्णांपैकी 56 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे.
यापैकी 51 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
तर पाच व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत.
कोरोना बाधित व्यक्तीमध्ये भुसावळ येथील 15 वर्षीय मुलगा, अमळनेर येथील 55 वर्षीय, पाचोरा येथील 56 वर्षीय, तर जळगाव येथील 30 व 57 वर्षीय पुरूषांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत करोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 37 झाली आहे. यापैकी दहा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एक रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे.
आता प्राप्त झालेल्या निगेटिव्ह अहवालातील 51 व्यक्तींपैकी 16 व्यक्ती या अमळनेरच्या, 6 व्यक्ती पाचोरा, 4 व्यक्ती भुसावळच्या तर उर्वरित जळगावच्या आहेत. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एका ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा