Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३० एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
अमळनेरकर डॉक्टरांनी स्वीकारले कोरोनाचे आव्हान प्रताप महाविद्यालयातील महिला वस्तीगृहात अमळनेर येथे कोव्हीड केअर सेंटरची निर्मिती- आमदार पाटील यांची भेट व पाहणी
अमळनेरकर डॉक्टरांनी स्वीकारले कोरोनाचे आव्हान प्रताप महाविद्यालयातील महिला वस्तीगृहात अमळनेर येथे कोव्हीड केअर सेंटरची निर्मिती- आमदार पाटील यांची भेट व पाहणी
प्रतिनिधी अमळनेर :येथील प्रताप महाविद्यालयातील महिला वसतिगृहात कोव्हीड 19 सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. दुपारी 12 वाजता आमदार अनिल भाईदास पाटील यांनी या रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली याठिकाणी 39 रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याठिकाणी संशयित रुग्ण व पॉझिटीव्ह मात्र लक्षणे नसलेल्या व्यक्तींना यापुढे दाखल करण्यात येणार आहे. तसेच ताप व खोकला या रुगांची तपासणी करण्यात येणार आहे. या केंद्रांचे आव्हान डॉ प्रकाश ताडे यांनी स्वीकारले असून त्यांच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे.
हे केंद्र 24 तास सुरू असून अत्यावश्यक सेवा याठिकाणी देण्यात येणार आहे तीन पाळ्यांमध्ये सहा डॉक्टर आणि सहा परिचारिका नियुक्त करण्यात आले आहेत महिला वस्तीगृहाच्या कॉमन हॉलमध्ये बाह्यरुग्ण तपासणी करण्यात येणार आहे या सर्वांसाठी एन 95 मास्क पीपीई किट उपलब्ध असून त्यांना सॅनेटाईझर उपलब्ध करून देण्यात आले आहे. याठिकाणी रुग्णांचे स्क्रिनिंग करण्यात येणार असून सर्व साहित्य उपलब्ध आहे.
रुग्णांसाठी स्वतंत्र खोल्या या ठिकाणी उपलब्ध केले असून दिवसभरात याठिकाणी तीन वेळा फवारणी करून परिसर आणि सॅनिटायझ करण्यात येत आहे. रुग्णांसाठी पाणी वीज जेवणाची उपलब्धता करून देण्यात आली असून 200 खाटांची निर्मिती करण्यात आली आहे. तर दहा खाटा पॉझिटीव्ह रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. येथील 24 स्वॅप तपासणीसाठी धुळे प्रयोगशाळेत रवाना करण्यात आलेले आहेत. याठिकाणी स्वतंत्र स्वॅप घेण्याची उपलब्धता करून देण्यात आली आहे. इतर उपचारांसाठी येथील ग्रामीण रुग्णालय सेवा पुरवत आहे
तज्ञ डॉक्टर नसल्याकारणाने येथील कुल रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. येथील रुग्णांची भेट घेऊन जळगाव पेक्षा याठिकाणी चांगली सेवा गरजूंना उपलब्ध झाली आहे त्यामुळे रुग्णांनी घाबरून जाऊ नये स्वतःचे रक्षण योग्यप्रकारे होईल व कोरोनावर मात करता येईल अशी अपेक्षा त्यांनी फक्त केली. व दाखल रुग्णांना आधार दिला. या सर्व बाबींची आमदार पाटील यांनी पाहणी करून माहिती जाणून घेतली व गरज भासल्यास वरून साहित्य उपलब्ध करण्याचे आश्वासन डॉक्टरांना दिले हे आव्हान स्थानिक डॉक्टरांनी स्वतःचा स्वीकारल्याने आमदार अनिल पाटील यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. गंभीर परिस्थिती असलेल्या रुग्णांना संदर्भ सेवा उपलब्ध केली आहे.
तालुक्यातील 18 कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील पॉझिटीव्ह निगेटिव्ह असे दोन विभाग तयार करण्यात आलेले आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा