Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३ मे, २०२०
Home
/
Unlabelled
/
धुळे महानगरपालिका क्षेत्रात ४ मे ते १० मे पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आदेश
धुळे महानगरपालिका क्षेत्रात ४ मे ते १० मे पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आदेश
धुळे:प्रतिनिधी धुळे महानगरपालिका हद्दीत व जिल्ह्यातील अन्य तालुक्यात आता पर्यंत कोरोना विषाणूचे ३० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत त्या पैकी सहा जणांचा मृत्यू झाला असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संक्रमण रोखण्यासाठी धुळे शहरात महानगर पालिकेच्या हद्दीत ४ मे च्या रात्री ००.०१ वाजेपासून ते १० मे च्या रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन (संचारबंदी) लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. ही संचारबंदी नागरिकांच्या हितासाठीच असून नागरिकांनी घाबरून न जाता संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करावे व जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले असून.
कोरोना विषाणूंचा प्रसार एका व्यक्तीपासून अन्य व्यक्तीस होण्याची शक्यता असल्याने जिल्हादंडाधिकारी श्री. यादव यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार धुळे महानगरपालिका क्षेत्रासाठी कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित केलेले प्रतिबंधित क्षेत्र वगळून ही संचारबंदी लागू राहील.
या संचारबंदीतून सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा व त्या अनुषांगिक सेवा, औषधे विक्रीची दुकाने, किराणा दुकाने, शासकीय सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानांमार्फत वाहतूक व धान्य वाटप, दूध, भाजीपाला व फळे विक्री दुकाने, अतितातडीचे शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा व कायदा सुव्यवस्था हाताळणारी यंत्रणा, बँक यंत्रणा, महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा माहिती अधिकारी यांनी प्राधिकृत केलेले मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे प्रतिनिधी, दूरध्वनी, इंटरनेट सेवा पुरविणारे अधिकारी वगळता अन्य सर्व व्यवहार हे दिलेल्या कालावधीत व अटीस अधिन राहून बंद राहतील.
कोविड-१९ प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रातील अधिकृत किराणा दुकाने, स्वस्त धान्य विक्रीची दुकाने, भाजीपाला, फळ विक्रीची दुकाने ही सकाळी ८ ते दुपारी २ या कालावधीत सुरु राहतील. दूध विक्रेत्यांसाठी सकाळी ६ ते रात्री ८, तर पेट्रोलपंपचालकांसाठी ही वेळ सकाळी ६ ते दुपारी २ अशी असेल. तसेच सदरचा आदेश हा सद्य:स्थितीत व भविष्यात कोविड-१९ प्रतिबंधित क्षेत्र घोषित झालेल्या क्षेत्रास लागू राहणार नाही. सदरच्या प्रतिबंधीत क्षेत्रात कन्टेन्मेंट अधिसूचनेनुसार घोषित प्रतिबंधानुसार अंमलबजावणी होईल.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७, मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) व भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतुदीनुसार दंडनीय योग्य ती कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा