Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३ मे, २०२०
धुळ्यात दोघा महिलांसह व्यापारी पॉझिटिव्ह; "कोरोना'चे ३१ रुग्ण बाधित
धुळे: प्रतिनिधी:शहराला संसर्गजन्य
कोरोना व्हायरस विळखा घालत आहे.या आजाराचे रात्री नऊनंतर आणखी तीन पॉझिटिव्ह रूग्ण आढळले.त्यामुळे शहरातील रूग्ण संख्या २३ झाली असून साक्रीतील चार,शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येकी दोन रूग्णांमुळे कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ३१ वर पोहोचला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
धुळे महापालिका हद्दीत सात प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर झाले असून ते प्रशासनाने "सील' केले आहेत.शिवाय काही अटीशर्तींसह दुपारी दोननंतर शहरात संचारबंदी आणि पूर्णत लॉकडाऊन आदेश लागू आहे.
शहरातील आझादनगर क्षेत्रातील गरीब नवाज नगरमधील पूर्वीच कोरोना बाधीत तरूणाची ४०वर्षीय आई आणि ८३ वर्षीय आजीला "कोरोना'ची लागण झाली आहे.तसा अहवाल सर्वोपचार रूग्णालया कडून आज रात्री प्राप्त झाला.यापाठोपाठ ह्रदयावर बासपास शस्त्रक्रियेसाठी २७ ला नाशिक येथे एका खासगी रूग्णालयात रवाना झालेल्या गल्ली क्रमांक सहाच्या परिसरातील६५ वर्षीय कापड व्यावसायिकाला नाशिक येथे "कोरोना'ची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले.त्यामुळे जिल्ह्याचा आकडा३१ वर पोहोचला. पैकी आतापर्यंत एकूण धुळे शहरात सर्वाधिक २३ साक्रीतील चार,शिंदखेडा व शिरपूर तालुक्यात प्रत्येकी दोन रुग्ण
पॉझिटिव्ह आढळले आहेत
यातही धुळे शहरातील चौघांचा,तर साक्रीतील दोघांचा मृत्यू झाला आहे. तत्पूर्वी, "कोरोना'चे जिल्ह्यात २८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते.
शहरालगत भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात आज सायंकाळी सहापर्यंत १८२व्यक्तींचे थर्मल स्कॅनिंग झाले. त्यात १९जणांना रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांचे नमुने तपासणीसाठी घेतले. कोरोना टेस्ट लॅबकडे३७ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहेत.पॉझिटिव्ह १९रुग्ण रुग्णालयात भरती आहेत.त्यांची प्रकृती स्थिर,तर दोघा रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले. दरम्यान, सर्वोपचार रुग्णालयातील लॅबकडून धुळे,नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील रुग्णांचे नमुने तपासले जात होते.मात्र, मालेगाव येथील नमुन्यांची तपासणी आता नाशिक येथे होत असल्याने येथे काही दिवसांत तपासणीच्या नमुन्यांमध्ये घट होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एका ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा