Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३ मे, २०२०
Home
/
Unlabelled
/
जळगावात गावठी दारूची विक्री करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगावात गावठी दारूची विक्री करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव प्रतिनिधी: जळगाव ;शहरातील तांबापुरा भागात अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू विकणार्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी २ हजार रुपये किमतीच्या दारूसह अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, संशयित आरोपी लखन दिवान गुमाने (वय-३१) रा. गवळीवाडा, तांबापूरा हा लॉकडाऊनच्या काळात बेकायदेशील देशी दारू विक्री करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, पो.ना. नितीन पाटील, इम्रान अली सैय्यद, पो.कॉ. गोविंदा पाटील यांनी आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरी जावून कारवाई करत त्याच्या ताब्यातील १ हजार ८०० रूपये किंमतीची ३० लिटर गावठी हातभट्टीची दारू हस्तगत केली. पो.कॉ. मुद्दस्सर काझी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी लखन गुमाने यांच्या विरोधात मुंबई दारूबंदी कायद्यानुसार एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा