Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३ मे, २०२०
धुळ्यात 2 मृतदेहांच्या अदलाबदलीने खळबळ
धुळे:प्रतिनिधी एस.टी. महामंडळाचे कर्मचारी असलेले रवींद्र दिलीप ठाकरे यांचे १मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते कोरोना टेस्ट करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला व तब्बल ४८ तास प्रशासनाने सदर मृतदेह आपल्याच ताब्यात ठेवला मृत रवींद्र ठाकरे यांचा रिपोर्ट निगेटिव्ह ही आलाच पण मधल्या वेळेत प्रशासनाकडून मृतदेहाची हेळसांड करण्यात आली असा आरोप नातेवाइकांनी केला आहे..
या पेक्षाही दुर्दैवी आणि दुःखद बाब म्हणजे तब्बल ४८ तासानंतर जेव्हा नातेवाईकांच्या मृतदेह ताब्यात मिळाला त्यावेळी प्रशासनाकडून त्यांना दुसर्याच एका व्यक्तीचा मृतदेह सुपूर्द करण्यात आला.
धुळे आरोग्य विभागाच्या या गलथान कारभारा वरून मृतक व्यक्तींचे नातेवाईक आणि समाजातून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जातोय तर जापी गावात दुसराच मृतदेह आल्याने गावकऱ्यांची तारांबळ उडालीय
एकीकडे केंद्र सरकार आणि सैन्य दलाकडून आरोग्य कर्मचारी आणि कोरोना वॉरियर्सचा सन्मान केला जात असताना दुसरीकडे धुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा बेजबाबदार आणि गलथान कारभार उघडकीस आला आहे.
मृत व्यक्तीच्या मृतदेहाऐवजी दुसर्याच व्यक्तीचा मृतदेह देण्याची धक्कादायक चूक धुळे आरोग्य विभागाकडून घडली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग झोपेत काम करतो आहे का,असा प्रश्न उपस्थित होत आहे?
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एका ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा