Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ८ मे, २०२०
सोशल डिस्टनशिंग च्या नियमानुसार साध्या पद्धतीने केला विवाह...
खिर्डी प्रतिनिधी कोरोना विषाणूचा पाश्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीचे नियम पालन करीत साईमत चे पत्रकार कांतीलाल गाढे यांनी आपल्या पुतण्याचा विवाह मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने बौद्ध परंपरेने पार पाडण्यात आला.
या अनोख्या विवाहाचे भुसावळ तालुक्यात तसेच रावेर तालुक्यात कौतुकाचा वर्षाव होत आहे.भुसावळ तालुक्यातील पिंपलगाव येथे ठरलेल्या तारखेस विवाह सोहळा करण्याचा निर्णय पिंपळगाव येथील उमेश हरी इंगळे यांची कन्या चि. सौ.कां.प्रियंका व रावेर तालुक्यातील रेम्भोटा येथील दिवंगत समाधान भावडू गाढे यांचा मुलगा चि. प्रतिक या वधू -वर पित्यांनी घेतला आहे.यावेळी सोशल डिस्टनशिंग चे पालन करीत व सर्वांनी तोंडाला मास्क बांधून गाजावाजा न करता हा आदर्श विवाह व कमी खर्चात पार पाडण्याची अत्यंत गरज या लॉकडाऊन च्या काळात असून गाढे परिवार यांनी जो निर्णय घेतला त्या गाढे कुटुंबावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.लग्नविधी बोद्धाचाऱ्या सारिपुत्र गाढे यांच्या हस्ते झाला या विवाहाला वरणगाव येथील सा. पो.निरीक्षक संदीप कुमार बोरसे, हरिष भोय व काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती त आदर्श लग्न सोहळा पार पडला
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा