Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ७ मे, २०२०
शासकीय नियमांचे पालन करून एक आदर्श विवाह सोहळा संपन्न
परंडा(प्रतिनिधी) दि.6 तालुक्यातील सक्करवाडी हे अगदी मराठवाड्याच्या सरहद्दीवरील लहानसे खेडेगाव, गाव तस नकाशापुरतच मर्यादित होत,पण गावाची खरी ओळख झाली ती दोन वर्ष केलेल्या सत्यमेव जयते वाटरकफ स्पर्धेतील पाणी फाऊंडेशनच्या कामाने,या स्पर्धेतील विजयाने, सिने अभिनेते आमीरखान यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह सोहळे, साखरपुडा त्यांनी पुढे ढकलले. मात्र या परिस्थितीत सुद्धा आपला विवाह सोहळा नियोजित तारखेला, वेळेला व्हावा यासाठी परंडा तालुक्यातील सक्करवाडी येथील एका जोडप्याने,दोन वर्षांपासून महाड येथे कृषी सहाय्यक पदावर नोकरी करणाऱ्या चि. सतीष बबन चव्हाण यांनी परंडा तालुक्यातीलच चिंचपूर(बु)येथील चि.सौ.का.कोमल दयानंद जाधव यांच्याशी लग्न ठरलं. मात्र या मार्चमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झालं आणि हे लग्न पुढे ढकलण्याचा दोघांच्या घरच्यांनी विचार केला. मात्र, आपलं लग्न हे ठरलेल्या वेळी 6 मे रोजी सायंकाळी साडेसहाला झालं पाहिजे असं ठरवून या जोडप्याने घरच्यांना सांगून याचं वेळेवर विवाह करण्याचं ठरवलं.
हा विवाह सोहळा अगदी घरच्याघरी आईवडील आणि जवळचे मोजके नातेवाईक यांच्या उपस्थित सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळून, हात धुण्यासाठी सिनेटायजरचा वापर करून, तोंडाला मास्क लावून व इतर नातेवाईक, मित्रमंडळी यांना अनुउपस्थित ठेवून हा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला अनेकांनी व्हट्सअप, मेसेज,फोन द्वारे नव वधू -वराना आशिर्वाद देऊन या विवाह सोहळ्याचं कौतुक केलं जात आहे.
सतीष व कोमल हे नव विवाहित दांपत्य म्हणाले,"कोरोनाचा बंदोबस्त करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे डामडौल न करता आपल्या घरात विवाहबद्ध होऊ शकता. लॉक डाऊन आहे म्हणून नव्हे, तर खर्च टाळून कायम असे विवाह सोहळ्याचे प्रयोग करता येऊ शकतात आणि ते सर्वांनी करावेत.
घरी रहा, सुरक्षीत रहा, प्रशासनास सहकार्य करा असा संदेश दिला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा