Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ७ मे, २०२०
निंभोरा येथील १४जणांना केले क्वारांटाईन,स्वॅब तपासणीसाठी रावेर रवाना,
रावेर तालुक्यातील निंभोरा-येथील एकाच कुटुंबातील संशयित असलेल्या १४ जणांना भुसावळ येथे आढळलेला कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण या परिवाराच्या संपर्कात आल्याने रावेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ शिवराय पाटील यांनी याबाबत सूचना करत सरपंच डिगंबर चौधरी,सहायक पोलिस निरीक्षक महेश जानकर ,तलाठी तडवी आदींना माहिती दिली.
त्या कुटुंबातील व्यक्तींना याबाबत माहिती देऊन स्वतः क्वारांटाईन होण्याबाबत सांगितले.त्यात दोन्ही कुटूंबातील सर्व सदस्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले.त्या सदस्यांची स्वॅब टेस्टिंग करण्यासाठी त्यांना १०८ च्या रुग्णवाहिकेने रावेर येथील कोविद सेंटरला नेण्यात आले .यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ शिवराय पाटील,सहा. पोलीस निरीक्षक महेश जानकर, पीएसआय शिंदे,सरपंच डिगंबर चौधरी तलाठी एस आर तडवी,ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील,पोकॉ राकेश वराडे,स्वप्नील पाटील,सुनील वंजारी,ईश्वर चव्हाण,अन्वर तडवी,प्रा आ केंद्राचे डॉ चंदन पाटील व आरोग्यसेवक, कर्मचारी,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर आदी उपस्थित होते.तर कामावर गेलेल्या काही सदस्यांची तपासणी करण्यासाठी त्यांचा शोध सुरू होता.त्यातील सर्व सदस्य हजर झाल्यावर त्यातील ०७ रुग्ण कोविद सेंटर रावेर मधूनतपासणी न करता परत घरी निघून आले. त्यांना पुन्हा पोलीस प्रशासन,ग्रामपंचायत कर्मचारी,तलाठी,कोतवाल, आरोग्य प्रशासनाच्या लोकांनी पुन्हा गाडीत बसवत रावेर रवाना केले.मात्र पोलीस प्रशासनाने संयम दाखवत त्या संशयितांना पुन्हा १०८मध्ये रावेर येथे रवाना केले. या व्यतिरिक्त तेथे कोण कोण संपर्कात होते याची चौकशी पोलीस करीत असून या कामी संध्याकाळी ०५ वाजता याबाबत निंभोरा पोलीस ठाण्यात बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस डॉ शिवराय पाटील,सपोनि जानकर, पीएसआय शिंदे,सरपंच डिगंबर चौधरी,यांसह डॉ एस डी चौधरी,डॉ दिलीप झोपे,डॉ जयेश वाणी,प्रल्हाद बोंडे,तलाठी तडवी,ग्रा वि अधिकारी गणेश पाटील,प्रमोद कोंडे,दुर्गादास पाटील,सुनिल कोंडे,रमेश येवले,राजीव बोरसे, नितीन पाटील,दिलीप सोनवणे,आशिष बोरसे,मुजाहिद शेख,वाय डी पाटील,मधुकर बिऱ्हाडे, मनोहर तायडे,युनूस खान,दस्तगिर पटेल,रवींद्र बारी,रतन वाघ,प्रभाकर सोनवणे,नसीम शेख यांसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान रावेर तालुक्यातून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात क्वारांटाईन करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली असून अफवांनी दिवसभर जोर धरला होता.तेव्हा प्रशासनाने अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
याबाबत दोन दिवसांनी रिपोर्ट येईपर्यंत ग्रामस्थांनी इजि अंतर ठेवत गर्दी टाळण्याचे व विनाकारणन फिरण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ शिवराय पाटील यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा