Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २ मे, २०२०

रस्त्याच्या दुतर्फा लावलेली अनेक झाडे जळून खाक वृक्ष संवर्धन समितीची कार्यवाही ची मागणी




शिंदखेडा प्रतिनिधी येथील शिंदखेडा ते चिमठाणे दरम्यान रस्त्याचा दुतर्फा लावलेली अनेक झाडे जाळून खाक झाली आहेत. निसर्ग प्रेमींना या गोष्टीचा प्रचंड राग आला असून प्रशासनाने या गोष्टीचे गांभीर्य ओळखून ज्यांनी हे कृत्य केले आहे 

त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी वृक्ष संवर्धन समितीने केली आहे.
शिंदखेडा ते चिमठाणे दरम्यान रस्त्याचा दुतर्फा वन विभाग, सामाजिक वनीकरण यांनी वृक्षरोपनं केले आहे. शहरातील निसर्ग मित्र भर उन्हात या लावलेल्या झाडांना पाणी देईन झाडे जगवण्याचा प्रयत्न निरंतर सुरु आहे. रस्त्याचा दुतर्फा असलेली झाडे भर उन्हात हिरवीगार व 10 ते 12 फुटांपर्यत झाली आहेत. 

शासन विविध योजना राबवून वृक्षारोपण करण्यावर भर देत असून याकामी करोडो रु खर्च करत आहे. मात्र शिंदखेडा ते चिमठाणे रस्त्यावर एस एस व्ही पी एस महाविद्यालयाचा पासून 1 किमी अंतरावर अनेक झाडे जाळण्यात आली आहेत. या गोष्टीचा निसर्ग प्रेमींना खूप राग आला आहे याचा प्रशासनाने गांभीर्य ओळखून सदर कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी वृक्ष संवर्धन समितीचे योगेश चौधरी, जीवन देशमुख, रोहित पाटील, राजेंद्र मराठे, भूषण पवार यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध