Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २ मे, २०२०
Home
/
Unlabelled
/
गुटखा ,पण्णी दारू ची होतेय सर्रास विक्री......... खिर्डी त महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागदेणार का लक्ष..? का होतेय पोलीस विभागाचे दुर्लक्ष?
गुटखा ,पण्णी दारू ची होतेय सर्रास विक्री......... खिर्डी त महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागदेणार का लक्ष..? का होतेय पोलीस विभागाचे दुर्लक्ष?
खिर्डी प्रतिनिधी: कोरोना वर नियंत्रणासाठी लॉक डाऊन सुरू असून जीवणावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्याकरिता छोटे किराणा दुकाने सुरू आहेत आणि त्याचा फायदा घेत गावातील लहान दुकानदार गुटखा पुढयांची सर्रास उघडी विक्री करण्यात येत आहे.त्या मध्ये किरकोळ विक्रेते लपून छपून 20 रुपयांची पुढी 50 ते 60 रुपयात विकत असून खिर्डी त दररोज हजारो रुपयांचा गुटखा पुढ्या विकल्या जात आहे.सद्यस्थितीत सर्व पान टपऱ्या बंद असून छोट्या किराणा दुकानावर गुटखा पुढ्या सर्रास विकल्या जात असून 2 पाकिटे विकली तर 200 रुपयांची कमाई होत आहे,
त्यामुळे चोरट्या मार्गाने गुटखा पाकीट विकण्याकरता धडपडत आहे,एकीकडे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई व दंड करण्याचा नियम मोडीत काढून गावामध्ये छुप्या मार्गाने मिळणाऱ्या पुढ्या खाऊन थुंकीच्या पिचकाऱ्या मारणे सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे,सगळी कडे बंदी असताना हा गुटखा चा माल येतो तरी कुठून हा पडलेला प्रश्न आहे ? सर्व बंद असताना पण्णी दारू खिर्डी त उघड्यावर विकल्या जात आहे.दारू साठी शेजारी असणारे खेडयातून लोकांची सकाळी आणि संध्याकाळी झुंबड उडत आहे.देशी दारूचा ४२ रु चां चप्पा २५० रुपयांला तर गावठी चां १० रु चां पैग ५० ला विकला जात आहे या अवैध धंदेवाल्यांची या लॉकडाऊन मध्ये चांदी होत आहे.सर्वत्र लॉकडाऊन असताना दारू दुकाने पान टपऱ्या बंद आहेत.
अशा स्तिथीत दारू,गुटखा व पान मसाला विक्रेते *सेल फ्रॉम होम* या पद्धतीने बिनधास्त चढ्या भावात विक्री करत असून मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे.रावेर तालुक्यातील काही भागात गावठी दारु विक्रेत्यांना पोलिसांचा काही एक धाक राहिलेला नाहीये ? असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. मागच्या आठवड्यात पुरी गोलवाडे येथील गावठी दारू बनवण्याची बट्टी उदवस्त केली तरी दारू येते कुठून?या वर पोलीस प्रशासन करते तरी काय ?हा प्रश्न समोर येतो. महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभाग काय करते या कडे सर्वांचे लागून आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा