Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ४ मे, २०२०

शिंदखेडा तालुक्यात घटना सलग तिसऱ्या दिवशी आग लावून झाडे जाळण्याचा प्रयत्न अग्निशामक बंबाच्या साहाय्याने आग विझवली



शिंदखेडा प्रतिनिधी येथील शिंदखेडा चिमठाणे रस्त्याचा दुतर्फा लावलेल्या झाडांना आज सलग तिसऱ्या दिवशी जाळण्याचा प्रकार समोर आहे. या घटनेने निसर्ग मित्र चांगलेच संतप्त झाले असून दोषींवर कार्यवाही व्हावी अशी मागणी होत आहे. 
आज सलग तिसऱ्या दिवशी दुपारी 3 च्या सुमारास शिंदखेडा चिमठाणे रस्त्यावर व्ही के पाटील इंग्लिश मेडियम स्कूल जवळ लागलेल्या आगीत अनेक झाडे जळून खाक झाली आहेत.  


आग लागल्याचे अमोल गोसावी यांच्या लक्षात येताच त्यांनी वृक्ष संवर्धन समितीचे योगेश चौधरी  यांना माहिती दिली. चौधरी यांनी तात्काळ अग्निशामक बंबाचे कर्मचारी वसीम शेख व अजय डोडवे  यांना कळवले, सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी सैंदाणे हे घटना स्थळी दाखल झाले. 

अग्निशामक बंबाच्या साहाय्याने लागलेली आग आटोक्यात आणली. पण या आगीत अनेक झाडे जळून खाक झाली आहेत. या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे निसर्ग मित्रांमध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या असून तात्काळ आग लावणाऱ्यांचा शोध घेऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी वृक्ष संवर्धन समितीचे योगेश चौधरी, जीवन देशमुख, रोहित पाटील, भूषण पवार, राजेंद्र मराठे यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध