Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ८ मे, २०२०
Home
/
Unlabelled
/
रावेर शहरातील बाजारपेठ रमजान ईद होईपर्यंत बंद ठेवा; मुस्लिम मोहल्ला कमेटी रावेर तर्फे तहसिलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
रावेर शहरातील बाजारपेठ रमजान ईद होईपर्यंत बंद ठेवा; मुस्लिम मोहल्ला कमेटी रावेर तर्फे तहसिलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
रावेर (प्रतिनिधी ) देशासह महाराष्ट्रात Covid 19(कोरोना) ने जागतिक थैमान घातले असून महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रूग्णांच्या संखेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे. ही बाब लक्षात घेता रावेर येथील मुस्लिम मोहल्ला कमेठी तर्फे आज तहसीलदारांना रमजान ईद होईपर्यंत बाजारपेठ बंद ठेवावे अश्या मांगनीचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात रावेर लागत काहीं किलोमीटर अंतरावर बर्हानपुर हे मध्यप्रदेशातील शहर आहे. व बऱ्हाणपूर शहरात काही दिवसांपूर्वी कोरोना बाधित रुग्ण वाढले आहे. तसेच शहरापासून काही अंतरावर भुसावल शहरात देखील कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. व रावेर शहरात व्यापरनिमित्त बऱ्हाणपूर व भुसावळ या दोन्ही शहरांमधील नागरिक येत असतात. व येथे कोरोना बधित रूग्ण असल्याने कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे.
कोवीडा 19 चा प्रादुभाव दिवसे दिवस वाढतच असुन महाराष्ट्र राज्याची परिस्थितीसुध्दा बिकट झाली असून त्या अनुशंगाने रमजान ईद निमित्ताने आपण रावेर येथे खरेदी साठी कपडा दुकान तसेच बुट चप्पल व अनावश्यक वस्तुची दुकाने उघडण्याची जर अनुमती दिली तर मार्केट मध्ये गर्दी वाढणार सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडल्या शिवाय राहणार नाही. ज्या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. भागाचे लोक मार्केट मध्ये गर्दी करु शकता. या कारणाणे रावेर शहरात हे विषाणू रोगाई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व प्रशासन या संकटातून जनतेला वाचविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. त्या पाश्र्वभूमीवर रावेर शहरात दक्षता घेण्याची गरज असून रावेर मध्ये अनावश्यक वस्तूंची दुकाने बंद राहणेच गरजेचे आहे. काही रुग्ण असे आहेत की त्यांना लक्षणे दिसत नाही. परंतु ते पॉझिटीव्ह निघालेले आहे. जनतेचा व देशाच्या हीता साठी रमजान ईद होई पर्यंत वरील नमुद केलेली दुकाने यांना चालु ठेवण्यासाठी परवानगी देव नये. दुकाने उघडल्यावर कोरोनाचा या विषाणूचा प्रादुभाव वाढल्यास स्थानिक प्रशासन जबाबदार राहील हा विचार करुन लोक हितात निर्णय घ्यावे.अश्या मांगणीचे निवेदन तहसीलदार यांना देऊन प्रत माहितीसाठी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री,जिल्हा अधिकारी जळगाव, प्रांताधिकारी साहेब फैजपुर,मुख्याधिकारी रावेर यांना देण्यात आले.
निवेदनावर शेख गयास शेख रशीद
आसीफ मोहम्मद दारा मोहम्मद
फिरोज खान गुलाब खान, युसुफ खाॅ इब्राहिम खाॅ, शफीयोद्दीन शेख कासम, शेख मोईन शेख यासीन,असद खान महेबूब खान,शेख एजाज शेख अमिनोद्दीन,सैय्यद आरीफ सैय्यद मोहम्मद,शेख फिरोज शेख गुलाब,शेख सादीक शेख अब्दुल नबी,असदउल्ला खान,अय्युब खा भुरे खा,आदिंसह आहे. अन्य नागरिकांच्या स्वाक्षरी आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एका ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा