Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ८ मे, २०२०
राष्ट् म्हटलं की देशाच्या जनतेला स्फूर्ती, स्फुरण, स्वाभिमान, आदर कर्तव्य, देशप्रेम, आईच्या मायेन प्रेम करणारी जनता आणि त्यांच्या वर तसंच प्रेम दाखवणारं सरकार... आज पाहतोय जनता काहीपण बोलते राजकारणी काहीपण एकमेकांना शिव्या देण्या शिवाय काहीच दिसतं नाही.
स्वातंत्र्य नंन्तर देशात सुरवात जवान किसान सक्षम होण्यासाठी पहिल्यांदा प्रयत्न झालेत. कृषिप्रधान देश घोषित करून कृषी वर आधारित अर्थव्यवस्था पहिल्या दोन तीन पंचवार्षिक योजनेत भरीव कार्य झालं नंन्तर हळूहळू ईतरत्र अर्थवेवस्था वळली ती नंन्तर तिकडे फिरकलीच नाही. जवान कामाचा म्हणुन ते क्षेत्र प्रगती त्या क्षेत्रात अर्थवेवस्था नियमित तरतूद असते आहे. मग सुरु झालं शेतकरी शोषण उच्च शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरीं याचा उलटफेर सुरवात झाली. कनिष्ठ शेती व्यापार नोकरी उच्च मानली जाऊ लागली आणि मरण 60 टक्के कृषी वर आधारित जनता मरण प्राय झाली करून सोडली या राष्ट्राने असंच वाटतं.
व्यापार वाढवा अर्थव्यवस्था बळकट व्हावी म्हणुन व्यापारी खूष करण्याच्या नादात जनता भरडली जाऊ लागली. व्यापाऱ्यांना भरीव सोई सवलती. जागा पाहिजेत देतो सरकारी जागा अधिग्रगीत करून घ्या जागा आणा उदोग. पैसा नाही कर्ज सांगा घ्या कर्ज हमी सरकार घेईल लुटा बॅंक उभारा उधोग. आणि देश प्रगती वाटचालीस तयार झाला असंच ना आणि व्यापार वाढीस लागून सर्व कडे गावोगावी उधोग उभारणी होऊ लागली शून्य भांडवलातून सरकारने टाकलेल्या पायघड्या वर औधोगिक क्षेत्र निर्माण झालं. अपवाद टाटा समूह सारखे बोटावर मोजण्या इतपत थोडी लोकं स्व निर्मितीतून व्यापार उभारणी करतं राहिले बाकी अंनत सरकारलाच लुटून उभे राहिले असंच दिसतं सरकार लुटलं गेल म्हणजे त्या देशाची जनता लुटली जाऊ लागली असं वाटतं. उधोग उभारणीस जे प्रोसाहन देतात तसं किती प्रमाणात शेतकऱ्यास देतात कृषिप्रधान देशात शोकांतिका आहे. शेतकरी आणि जनतेची. शेतकऱ्यांना सांगितलं मी चांगली शेती करतो मला अजुन शेती उपलब्ध करून दया तर मिळेल का हो इंच भर भाड्याने शेतकऱ्यास याचं उत्तर नाही. तेच व्यापाऱ्याने सांगितलं मी येतोय जागा दया तर तात्काळ जमीन उपलब्ध करून दिली जाते भले शेतकरी देणार नाहीत तर कायदा दाखवुन स्वप्न दाखवुन कमी पैश्यात अधिग्रहित करून सरकार व्यापाऱ्यास देते हा झाला फरक म्हणजे. याला लुटायचं त्याला पोसायचं असंच.
अलीकडे शाळशुद् म्हणतात व्यापारी अर्थव्यवस्था बळकट करतो कर भरतो.. ही शुद्ध दिशाभूल चालवली गेलेली मोहीम जनतेची फसवणूक वेडं मूर्ख बनवण्याचा फ़ंडा अवलंबला गेला आणि जनता नागवली गेली जातेय. कर कोण भरतं हो? पाहिलं बघितलं तर जनता.आणि तेच आहे.
या कडे सोईस्कर दुर्लक्ष करून व्यापारी पोसले गेले जनता पिळली गेली जातेय याचं भान राहिलं नाही अलीकडे राज्य करत्यांना आणि राहील कसं त्यांची तुमडी कशी भरतील जनता पोसली गेली तर आता असं दिसतं राजकारणी जनतेच्या टाळू वरचं लोणी खाण्यात मग्न झालीत असं वाटतं.
बरं वरील मुद्धा जनता कर भरते हा अपूर्ण राहिला ते कसं हे आपणास समजावतो. अर्थात ज्यांना माहिती नाही गरीब जनता त्यांना लुटणार्यांना तर माहिती आहेच कसं ते. व्यापारी कधीच कर भरतं नसतो हे अधोरेखित सत्य आहे. असं माझं विधान आहे. कारखान्यात वस्तूच उत्पादन झालं त्या उत्पादित वस्तु वर कर लावला जातो असं सांगितलं जातं निर्विवाद सत्य मग तेव्हा व्यापारी कर भरतो तर नाही. उदा सांगतो साबण उत्पादित करणारी कम्पनी साबण तयार करायला खर्च आला 10 रुपये सरकार सांगत साबण ला कर राहील 2 रुपये मग व्यापारी त्या साबण ची किंमत ठेवतो 15 रुपये. ज्या दिवशी साबण आपण 15 रुपयाला खरेदी करतो त्या दिवशी साबण कंम्पनी ला ते पैसे जातात त्यातुन 2 रुपये तेव्हा सरकारला भरतो. आणि असं सांगतो मी कर भरला पण खरा करदाता हा ग्राहक असतो. खरा करदाता हा व्यापारी नव्हे त्याला काही फरक पडत नाही सरकारने कोणत्याही वस्तूवर किती कर लादला फटका खरेदीदार जनतेला असतो. जनता हेचं विसरली नव्हे काही महाभाग जनता लुटारू पसरवतात तुमी कुठं कर भरता व्यापारी कर भरतो. शुद्ध दिशाभूल साऱ्यांची. माझं म्हणणं पटतं नसेल तर आज बघा सरकार जवळ पैसा नाही म्हणुन दारू दुकान सुरु केलीत का? दारू विकली जाईल जरी दारू पिणारा आजारी पडला त्याची मुलंबाळं भुकेन मेली तरी चालतील. पण त्याने बाटली विकत घेतली कंम्पनी आणि सरकार दोघ पोसले जातील आणि जनतेला सुविधा मिळतील असंच ना? आता सांगा तुम्ही कर कोणी भरला. आज सरकार अघोरीं कृत्य अवलंबत आहे देशाच्या जनतेला लुटायचं कर वाढवून सुधारणा निर्माण करण्या साठी कर आकारणी करतोय असं दाखवुन व्यापारी आणि सरकार आपला भाग काढुन मग उरलं तर जनतेच्या तोन्डाला पानं पुसायची नाहीतर कटोरा आहेच हातात दया दान करतो सुविधा. जनता काही मागते तर त्यास काही राजकारणी भिकाऱ्या सारखं मागता असंच म्हणतात ना? मग जनते साठी सरकार भिकारी का होतंय झालं? याचा अर्थ आपत्कालीन तरतूद शिल्लक नाही काय? नसेल तर कुठं वापरली? असेल तर किती? ही वेळ नाही विचारण्याची. मी काही अर्थतन्य नाही.गरीब शेतकरी माणूस ज्या भावना उत्पन्न झाल्यात त्या लिहल्या. मद्य दुकानं सुरु करून जनतेला मरणाच्या खाईत ढकललं जातंय. आणि जनते साठीच सारं करतोय असं सांगितलं जातंय. दारू पिऊन जर अर्थवेवस्था बळकट होतं असेल तर करा समर्थन सार्यांनी प्या सर्वानी पोसा दारूच्या कंम्पन्या अगोदर मग तुकडा फेकू सुधारणा नाव. केलं आम्ही असं त्यालाच लुटून त्याच्या साठी केलं असा आवं आणत असतं सरकार... देशाची गंगाजळी कमी झाली असं वाटतं का कमी झाली असं कोणी विचारायला गेला आज. तर त्यास नतभ्रष्ट देशद्रोही ठरवला जाईल असं दिसतं.. बरं सारी नव्हे बरीच राज्यकर्ती एका माळेतील मणी असं लोकं म्हणतात. थोडा फार फरक असंच त्यास दोषी जनताच. सभेत निवडणुकीत खोटं आश्वासन दाखवत असतात असं माहित असूनसुद्धा मतदार मतदान करतो. कोणी त्या दिवसाची मजुरी रोज घेऊन मतदान करतं किंवा अशींच मध्याची बाटली.माझं मतं मतदान करू नका असं नाही सत्यवादी प्रामाणिक समाजसेवक निवडा. पैसे घेऊन मतं विकू नका प्रामाणिक राहा सारे मिळुन चुकलं तर जाब विचारा असं मी म्हणतो.. राष्ट् अघोरीं मार्गानं चाललंय पैश्या साठी काहीपण असंच दिसतं कोणीच कोणाची भूमिका भावना आयकत नाहीत समजुन घेत नाहीत असंच.समजलं तरी दुर्लक्ष करतात. माझ्या सारखी मूर्ख लिहतात असंच. सत्य वेडं ठरतं येथे... चांगल्या गुणी लोकांना किंमत नाही... साने गुरुजी. कवितेतून सांगतात. सागरा प्राण तळमळला... प्राण तळमळला स्वतंत्र देशातील स्थिती पाहुंन देहत्याग केला. असंच चांगली लोकं मृग गिळतात कोणी फासावर जातं कोणी मरत, झटत असतं यातना सोसत राहतं.. मी म्हणेन जनता दोषी वेळी बघत नाही. आज महामारी संकट आलं काय करावं कोणाला सुचतं नाही. त्या साठी राष्ट्र सक्षम राहिलं पाहिजे जगलं पाहिजे. ते केव्हा राहील जनता सक्षम राहिली तर..चांगली निःस्वार्थ सत्य मार्गानं चालणारी भ्रष्ट भ्रष्ट्राचार न करणारी खपवून न घेणारी तरच शक्य नाहीतर. पुढे सर्वांना यातना कठीण येतील. कर प्रणाली त्यातून मिळणारा पैसा अश्या संकट समई राखून ठेवला पाहिजे. असे अघोरीं मार्ग मद्य विक्री चलना सारखे अवलंबण्याची वेळ यायला नको कधीच. असं यातून सुचवायचं आहे.
जे लिहलं चुकलं असेल तर माझं वेक्तीगत मतं सोडून दयाव.माफी असावी सहमत असावं असं नाही. मी कुणाला दोषी मानत नाही कुणाशी वैर नाही पण वृत्ती बदलली पाहिजे साऱ्यांची माणसं सारी चांगली असतात. त्यांच्या भावना वृत्ती बदलली पाहिजे. दृष्टिकोन सकारात्मक हवा...
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा. जळगाव
9922239055
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एका ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा