Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २ मे, २०२०
Home
/
Unlabelled
/
"दाढी,कटिंग वाढल्या...!अनेकांनी शोधला घरच्या घरी झिरो मशीनचा पर्याय." "टक्कल करण्याशिवाय पर्याय उरला नाही."
"दाढी,कटिंग वाढल्या...!अनेकांनी शोधला घरच्या घरी झिरो मशीनचा पर्याय." "टक्कल करण्याशिवाय पर्याय उरला नाही."
तोरखेडा: प्रतिनिधी गेल्या २५ दिवसापासुन लॉकडाउन सुरू असल्याने सलुनची दुकाने बंद आहेत.त्यामुळे कटिंग करण्याचा पर्याय खुंटल्याने सर्वांना वाढलेली दाढी,कटिंग घरीच करावी लागत असल्याचे चित्र असून अनेकांनी झिरो मशीन वापरून एकमेकांची कटिंग करण्यावर जोर दिलाआहे.
कोरोनाच्या संक्रमणावर मात करण्यासाठी लॉकडाऊन सुरू असल्याने हा लॉकडाऊन किती दिवस चालणार हे अस्पष्ट असल्याने युवकांनी झिरो मशीनच्या साहाय्याने टक्कल करण्यावर भर दिला आहे.त्यामुळे साहजिकच पैशाची बचत होत असली तरी पाहिजे तो शेप कटिंगला मिळत नसल्याने काहीशी नाराजी तरुणवर्गात असतांना नाइलाजास्तव हा पर्याय सर्वांना अमलात आणावा लागत आहे.
कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी सद्या भारतभर लॉकडाऊन असल्यामुळे अनेक दुकाने गेल्या २५ दिवसापासून बंद आहेत.त्याची काहीशी झळ सर्वांनाच आजरोजी बसत असुन नाइलाजास्तव
सर्वानी यापुढे हात टेकले आहे.त्यातील एक म्हणजे हेअर कटिंगची सलून दुकाने बंद असल्याने अनेकांची दाढी,कटिंग वाढल्याने सर्वांची 'बॉडी लँग्वेज' बदलल्याने यावर वेगवेगळे पर्याय शोधण्यावर भर दिला जात आहे.काही तरुणांनी तर स्वतःच खरेदी केलेले झिरो मशीन वापरून एकमेकांच्या दाढ्या,कटिंग घरच्या घरी करून या संक्रमणावर मात करण्यासाठी पुढचे पाऊल उचलले आहे.वयस्क मंडळींनी तर बाजारात मिळणाऱ्या जिलेट ब्लेटद्वारे दाढी व टक्कल करून आम्हीही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.दुसरीकडे सलून चालकांचे दुकाने बंद असल्याने त्याच व्यवसायावर आपली उपजीविका भागविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
"शेतात सलुनचालकांना बोलावून दाढ्या कटिंग करण्याचा व्यवसायही तेजीत."
शहरातीलच नव्हे खेडेगावातील सलुनची दुकाने बंद असल्याने दाढ्या,कटिंग करण्याची पंचाईत होत असल्याने काही बहाद्दरांनी खुद्द सलून चालकांना आपल्या आपल्या शेतात मोबाईल फोनद्वारे बोलावून केसांचा सेफ बनवून घेतला आहे.याकरिता जास्तीचे पैसे मोजायची तयारी त्यांनी यासाठी ठेवली आहे.
"मुंबई,पुण्यावरून परतलेल्यांची व शाळकरी मुलांची झिरो मशीनला पसंती."
आजच्या तरुणाईच्या 'वन साइड,टू साइड 'व दाढी ठेवण्याच्या फॅशनला कुठेतरी आळा बसला असून थेट झिरो मशीनच्या साहाय्याने बारीक कटिंगला महत्व प्राप्त झाले आहे.वाढलेल्या दाढ्यानाही ही मशीन व्यवस्थित शेफ देत असल्याने नाईलाज म्हणून घरच्या घरी दाढ्या,कटिंग करतांना वेळेचा टाइमपास पण होत आहे.
"सलून चालकांवर उपासमारीची पाळी."
वंश परंपरागत आपला व्यवसाय टिकून ठेवणाऱ्या नाभिक समाजाने काळाची गरज ओळखून सलुनची अत्याधुनिक सोयीसुविधानी थाटलेली दुकाने सद्या बंद असल्याने हजारो रुपये गुंतवलेल्या व बँकेतून कर्ज उचललेल्या या व्यवसायातून झीरो उत्पन्न सद्या येत असल्याने बँकांचे हफ्ते भरण्यासोबतच संसाराचा गाढा ओढण्यासाठी कमालीची घालमेल होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

Nice batmi dada
उत्तर द्याहटवा