Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १० मे, २०२०
सत्रासेन येथील केसरी कार्ड धारकांना रेशन वितरण
सत्रासेन ता चोपडा:-कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कोणीही उपाशी राहू नये यासाठी शासन सर्वतोपरी खबरदारी घेत आहे. यामध्ये एपीएल केसरी रेशन कार्डधारकांसाठी जे राष्ट्रीय अन्नसुरक्षा यादीमध्ये येत नाहीत,ज्यांना दरमहा धान्य मिळत नाही अशांसाठी राज्यशासनाने योजना सुरू केली
असून ते धान्य आज पासून सत्रासेन तालुका चोपडा येथील स्वस्त धान्य दुकानांमध्ये केसरी कार्डधारकांना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ वितरित करतांना दिसून येत आहे.यामध्ये ८ रुपये किलो प्रमाणे गहू तर 12 रुपये किलो प्रमाणे तांदूळ असे धान्य सोशल डिस्टन्सींग चे नियम पाडून वितरण करतांना दिसून आले. या ठिकाणी केसरी कार्डधारकांनी कुठलीही घाई गोंधळ न करता धान्य घेतांना दिसून आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एका ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा