Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १० मे, २०२०
Home
/
Unlabelled
/
खिर्डी बुद्रुक येथील ग्रामसेवक यांच्या अतिरिक्त चार्ज मुळे वाढली कोरोना समितीची डोकेदुखी. अतिरिक्त चार्ज काढून घेण्याची मागणी.गटविकास अधिकारी यांचे दुर्लक्ष;
खिर्डी बुद्रुक येथील ग्रामसेवक यांच्या अतिरिक्त चार्ज मुळे वाढली कोरोना समितीची डोकेदुखी. अतिरिक्त चार्ज काढून घेण्याची मागणी.गटविकास अधिकारी यांचे दुर्लक्ष;
खिर्डी ता रावेर:प्रतिनिधी रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथील ग्रामसेवक विजयकुमार महाजन यांची नियुक्ती खिर्डी बुद्रुक येथेच असून मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या खानापूर येथे त्यांना अतिरिक्त चार्ज हा गटविकास अधिकारी यांनी दिलेला असून खिर्डी येथील कोरोना समितीला गाव व आरोग्य विषयी निर्णय घेण्यास विलंब होत असून खिर्डी मध्ये कोरोना विषाणू येऊ नये म्हणून प्रतिबंधित उपाययोजना ला उशीर होत असताना दिसत आहे.
कोरोनाच्या पाश्वभूमीवर इतर गावसारखे खिर्डीत सुद्धा उपाययोजना करण्यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्याची या समितीत निवड करण्यात आली आहे , या संदर्भात गटविकासअधिकारी यांच्या कडे विचारणा केली असता,त्यांनी सुद्धा उडावाउडवी ची उत्तरे दिली .
ग्रामसेवकांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे खिर्डी चाच चार्ज मिळावा व खानापूरचा चार्ज काढून घ्यावा असा विंनती अर्ज केलेला आहे मात्र त्या अर्जा कडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात येत आहे असे निदर्शनात आले आहे.
सध्या महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातून अडकलेले नागरिक परत घरी येत असून त्यांना १४ दिवसा साठी ˈक्वॉरनटाईन करण्याच्या प्रशासनाकडून सूचना दिल्या आहेत मात्र याची जबाबदारी गावातील कोरोना समितीची असून ग्रामसेवक अश्या काळात एक दिवसा आड येत आहे त्यामुळे येथील कोरोना समितीच्या व इतर लोकांची डोकेदुखी वाढली आहे.म्हणून ग्रामसेवकाला खिर्डी ऐवजी दुसरे अतिरिक्त चार्ज देऊ नये अशी मागणी परिसरातून होत असून सदरील त्या परिसरातील ग्राम सेवकाकडे पुन्हा अतिरिक्त चार्ज देण्यात आलेला आहे परंतु खिर्डी ते खानापूर हा जवळपास ३० कि.मी प्रवास अंतर जास्त होत असल्याने ग्रामसेवकांची नियुक्ती खिर्डी बुद्रुक याच गावामध्ये होणे गरजेचे आहे.सदरहून गटविकास अधिकारी यांनी सुद्धा याविषयी उडवाउडवीची उत्तरे देऊन २-३ महिन्यापासून हा अतिरिक्त चार्ज काढला गेलेला नाही या कोरोना समितीला निर्णय घेणे कठीण जात असल्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ग्रामसेवक विजयकुमार महाजन यांची नियुक्ती सुमारे ६ हजार वस्तीचे गाव असलेले खिर्डी बुद्रुक येथे उपाय योजना करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे ग्रामसेवक यांची नियुक्ती खिर्डी बुद्रुक येथेच करावी व अतिरिक्त असलेल्या खानापूर चार्ज काढून घेण्यात यावा अशी ही मागणी खिर्डी येथील ग्रामस्थ करीत आहे .
प्रतिक्रिया
गटविकास अधिकारी (सोनिया नाकोडे)
आम्ही प्रत्येक ग्रामसेवकाकडे अतिरिक्त चार्ज दिलेला आहे हा अतिरिक्त चार्ज देने आमच्या वर अवलंबून आहे आम्ही कोणत्याही ग्रामसेवकावर हा अतिरिक्त चार्ज देऊ शकतो तो आमच्या मर्जी चा प्रश्न आहे असे वक्तव्य गटविकास अधिकारी यांनी केले .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एका ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा