Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ८ मे, २०२०

नगाव येथे असाही एक विवाह


पंकज पाटील :तरुण गर्जना - जगभर कोरोनाने थैमान घातलेल्या आजाराचे गांभीर्य लक्षात घेत घरातच आयोजित केला आदर्श विवाह. नगांव तालुका अमळनेर येथील श्री सुरेश पाटील यांच्या मुलाचा सुनिल पाटील वाघरे ता पारोळा यांच्या मुलीशी विवाह दि २६ मार्च रोजी तिथीनुसार ठरलेला  होता .हा विवाह सध्या जगभर थैमान घातलेल्या कोरोना आजारामुळे पुढे ढकलण्यात आला .लॉक डॉऊन वाढतच असल्याने विवाहाची तारीख हि पुढे वाढतच होती.

 यावर्षी होणारे  सर्वच विवाह थांबवून डिसेंबर नंतर करण्याचा  विचार ठरत आहे  . जुन्या चालीरितीला  फाटा देत गावातील सरपंच,उपसरपंच,पोलीस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनो रोगाची वाढती संख्या पाहता  पुढच्या तारखेची  वाट न बघता अखेर धनश्रीचा  राजेंन्द्र सोबत विवाह नगांव येथे आज दि ८ मे २०२० रोजी सकाळी ११.००  वाजता पार पडला .

या विवाह प्रसंगी अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा संदिपजी वायाळ,प.स सदस्य विनोद जाधव,लोकनियुक्त सरपंच महेश पाटील,पोलीस पाटील प्रविण गोसावी,उपसरपंच देविदास पाटील, ग्रा.प.सदस्य दिनेश पाटील, विजय पाटील,ग्रामसेवक महेंद्र देसले यांच्या साक्षीने व आशिर्वादाने संपन्न झाला.

या आदर्श विवाहास नगाव ग्रामपंचायती कडून ५१०० रूपयांची आर्थिक मदत देऊन तालुक्यात समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला गेला.

 विवाह प्रसंगी आरोग्य सेवक हीरवडे मॅडम,डॉ खुशाल पाटील,ग्रामरक्षक दलाचे वाल्मिक पाटील,जगदीश पाटील,भूषण पाटील,दगा नाना, रमण आप्पा,धना बापु यानी सहकार्य करून विशिष्ट सुरक्षित अंन्तर ठेवून विवाह संपन्न केला.

पोलिस पाटील प्रविण गोसावी यांनी वधु व वर पक्षाची समजूत घालत अनावश्यक खर्च टाळत दोन्ही कुटुंबाच्या समजुतीने   विवाह. संपन्न झाला .आजचा समाज इतिहास विसरला .जो समाज इतिहास विसरतो तो समाज ,ते राज्य अधोगतीला गेल्याशिवाय राहत नाही. त्याचा विनाश अटळ असतो. आज कोरोना आपल्याला आपली संस्कृती शिकवून जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील आपल्या आयुष्यात सामान्य कुटुंबातील कर्तबगार ,शूर मावळ्यांशी सोयरिक केली.लग्नात हुंडा दिला नाही व घेतला नाही .राजे छत्रपती असतांना देखील मुला-मुलींचे लग्ने थाटा माटात  न करता साध्या सोहळ्यात केली. महाराष्ट्रातील जनता ज्याला देव मानते त्यां राजांच्या  नावाने सर्व काही करते पण त्यांचा आदर्श प्रत्यक्ष जिवनात आचरणात आणत नाही. खरच यांना शिवभक्त म्हणावे का ? जो शिवाजी महाराजांचा मावळा आहे  तो शिवशाही पद्धतीने लग्न लावून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज आचरणात आणेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही .

तोच आदर्श कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगाव येथे घेण्यात आला .पण त्यात सातत्य ठेवत विवाह सोहळे साध्या  पद्धतीने करण्याची मानसिकता समाजानी यापुढे  ठेवली पाहिजे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध