Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३१ मे, २०२६
युवकावर भरदिवसा जीवघेण्या हल्ला सतर्कते मुळे वाचले प्राण.
वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९ चे कलम ४/२५ प्रमाणे.
फिर्यादी राहुल भास्कर मोरे वय-३५ वर्षे, व्यावसाय-शेती, रा. कसबे वणी, ता. दिंडोरी यांनी आरोपी १) कृष्णा संतोष चव्हाण २) गुरू राजु बागुल दोन्ही रा. नवनाथ नगर, पेठरोड नाशिक यांच्यावर वर नमूद कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला दि. ३०/०५/२०२६ रोजी दुपारी दुपारी १२/३० वा.चे सुमारास फिर्यादी राहुल मोरे यांचे दिप्ती वॉईनच्या जवळील स्नॅक्सच्या दुकानाजवळ वरील ता. वेळी व ठिकाणी यातील आरोपीत मजकुर १ यांनी फिर्यादी यांचे मोबाईलवर फोन करून बोलावुन घेवुन मागील भांडणाची कुरापत काढुन आरोपी क्र. १ यांनी वाईट साईट शिवीगाळ करून त्याचे पॅन्टमधुन चाकु काढुन फिर्यादीचे छातीचे डावे बाजुस बरगडीस मारून दुखापत करून आज तुला जिवंत सोडणार नाही व आरोपी क्र.२ यांनी त्याचे हातातील चाकु दाखवुन तु बाहेर भेट तुला संपवुनच टाकतो असा दम देवुन निघुन गेले वणी पोलीस स्टेशन ला घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी सावधानतेची भूमिका घेत तात्काळ पोलीस कर्मचारी यांना घटनास्थळी पाठवून आरोपीताना ताब्यात घेतले विशेष म्हणजे तपासिय अधिकारी तथा उप पोलीस निरीक्षक किरण जगदाळे यांची कामगिरी या प्रकरणात खूपच कौतुकास्पद आहे आपण नेहमी मुव्हीज मध्ये पाहतो कि पोलीस गाडीचा पाठलाग करतात सिंघम स्टाईलने आरोपिना पकडतात परंतु वणी पोलीस ठाण्याचे सिंगम पोलीस उपनिरीक्षक किरण जगदाळे यांनी खरोखर सिंगम स्टाईलने जीवाची पर्वा न करता चालत्या मोटरसायकलवरून आरोपीच्या गाडीवर उडी मारून जीव धोक्यात टाकून आरोपीना ताब्यात घेतले ही कौतुकास्पद बाब आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण जगदाळे हे करीत आहेत.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा