Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ८ मे, २०२०
मजुरांच्याच्या लुटीत सुरु "सेवा-व्रत"... निवेदनाद्वारे कारवाईची मागणी..
रोजगार अभावी घराकडे परत जाऊ इच्छिणाऱ्या मंजुरांच्या लुटीचे सत्र शहरात सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ई पासच्या नावाखाली सेवाव्रत सेतू केंद्रांनी पैश्यांची चालवलेली लुट बंद करून चुकीची माहिती भरून दिल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई करून मिळणे बाबत निवेदन नायब तहसिलदार यांना देण्यात आले.या गंभीर प्ररकारावर प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उत्तरप्रदेश व मध्यप्रदेश येथील एकुण १८ मजुर हार्वेस्टिंग मशीनच्या कामासाठी शिरपूर तालुक्यात आले होते.लॉकडाऊनमुळे गेल्या एक महिण्यापासून ते शिरपूर येथे थांबले होते.शासनाने मायदेशी जाणाऱ्या मजूरांसाठी मोफत ई पासची सुविधा सुरु केली.मात्र या मोफत ई पासचा गैरफायदा घेत शिरपूर शहरातील सेवाव्रत सेतूकेंद्रावर ई पास बनवण्याच्या नावाने प्रत्येक व्यक्ती १०० रूपये घेण्याचा धंदा सुरु असल्याचे उघड झाले आहे.ती ई पास देखील चुकीच्या पध्दतीने बनवुन दिल्याने चारही मजुरांना भुसावळ येथुन पुन्हा शिरपूर परत यावे लागले आहे. याबाबत तक्रारदार स्वप्नील जाधव यांनी शिरपूरचे नायब तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले की, परप्रांतीय मजूरांची व्यथा न समजता सेवाव्रत सेतुकेंद्र गरीब मजूर लाचार असल्याचा फायदा घेऊन त्यांचा ई पास अर्ज भरून देण्यासाठी सेवेच्या नावाने मेवा उचलत आहेत. त्यांच्याकडून सेवेच्या नावाने अव्वाच्या सव्वा फी आकारून २४ तास सेवाव्रत कार्य करीत आहोत असे छातीठोक पणे सेवेकरी सांगतात. उत्तप्रदेश कानपुर येथील शिवम गुप्ता व त्यांच्या सोबत इतर १८ व्यक्तींची ई पाससाठी अर्ज भरण्यासाठी सेवाव्रत सेतू केंद्रा वर तक्रारदार स्वप्नील जाधव गेले असता त्यापैकी ४ व्यक्ती उत्तरप्रदेश जाणारे होते तर १४ व्यक्ती मध्यप्रदेश जाणारे होते.त्यासाठी एकुण २ अर्ज आहेत प्रती अर्ज १०० रुपये म्हणजेच २०० रुपये सांगण्यात आले,परंतु अर्ज पूर्ण होताच १८ व्यक्तींचे १८०० रुपये लागतील असे सेवाकेंद्र चालक यांच्या कडुन सांगण्यात आले. मात्र शिवम गुप्ता यांच्या कडे १२०० रूपये शिल्लक होते त्यातून १००० रूपये देऊन बाकीचे ८०० रूपये पास घेतांना देतो अशी विनंती करून तो तंटा मोडला.
पैश्यांच्या धुंदीत बेभान या सेवाव्रत सेतुकेंद्राने चुकीच्या पध्दतीने पास बनवून दिल्याने चारही मजुरांना भुसावळ येथून परत शिरपुर यावे लागले.या मेव्याची सेवा करण्याची दुकाने बंद करा जे माणुसकी शब्दावर काळोख पोहोचवून मजूर शिवम गुप्ता सारख्या लोकांचे नुकसान करीत आहेत. व सेवेच्या खाली लुटमार करीत आहेत याबाबत कारवाई करण्यात यावी असे निवेदनावर लिहीण्यात आले.
निवेदनावर स्वप्निल जाधव,आरीफ खान,शिवम गुप्ता यांच्या स्वाक्षरी आहेत.
या गंभीर परिस्थिती कडे प्रशासन काय कारवाई करतात ? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा